कवठेमहांकाळ येथे उत्तर प्रदेशातील घटनेचा विविध पक्ष व संघटना च्या वतीने तीव्र निषेध.....
कांग्रेस पार्टी आदिवासी विकास संघ बळीराजा पार्टी शाहू विचारमंच किसान सभा व यांचे वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
कवठेमहांकाळ येथे उत्तर प्रदेशातील घटनेचा विविध पक्ष व संघटनाच्या वतीने तीव्र निषेध.....
कांग्रेस पार्टी (congress) आदिवासी विकास संघ बळीराजा पार्टी शाहू विचारमंच किसान सभा व यांचे वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयभाऊ कोळी, काॅग्रेसचे (congress) कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, प्रा.अमोल वाघमारे, बळीराजा पार्टीचे बाळासाहेब रास्ते, किसान सभेचे काॅ. दिगंबर कांबळे उपस्थित होते.
थोडक्यात माहीती अशी की उत्तर प्रदेशातील मागासवर्गीय मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत व राहुल गांधी यांच्यावर झालेल्या लाठीचार्ज बाबत दिनांक ६-१०-२०२० रोजी कांग्रेस पार्टी (congress) आदिवासी विकास संघ बळीराजा पार्टी विचारमंच किसान सभा व महिला आघाडी यांच्या वतीने तहसील कवठे महांकाऴ कार्यालयासमोर निदर्शने करताना त्याबाबत निवेदन कवठे महांकाऴ नायब तहसीलदार भिसे साहेब यांना देण्यात आले. निवेदन देताना शाहू विचार म्हणजे प्रा. दादासाहेब ढेरे, काँग्रेस (congress) पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, आदिवासी विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयभाऊ कोळी,लहुजी क्रांति मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ सकट, कॉम्रेड दिगंबर कांबळे, बळीराजाचे बाळासाहेब रास्ते, अमोल वाघमारे , निशिकांत वाघमारे, चैतन्य पाटील, पोपट पाटील,व सर्व पद अधिकारी या वेळी उपस्थित होते.
सांगली
प्रतिनिधी - जगन्नाथ सकट
___________
Also see : "पगडी फाळा"शेकडो वर्षाची परंपरा आजही