ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar news

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप मनसे  युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांबाबतच्या वक्तव्याच्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांना पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यातच आता भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे.(We will meet in the first week of August: Sudhir Mungantiwar)

राज ठाकरे यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेईन, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगतिलं. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्यात गैर काय? भविष्यात काँग्रेस आणि भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो,असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का?


राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. 

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो.(We will meet in the first week of August: Sudhir Mungantiwar)

40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही.आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती.