माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते गेवराईत स्वरांजली संगीत क्लासेसचा शुभारंभ

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील ग्रामीण भागातून संगीत विशारद शिक्षण घेतलेल्या सिद्धेश्वरी कोकाटे यांच्या स्वरांजली संगीत क्लासेसचा शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते गेवराईत स्वरांजली संगीत क्लासेसचा शुभारंभ
Swaranjali Music Classes

माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते गेवराईत स्वरांजली संगीत क्लासेसचा शुभारंभ

गेवराई  तालुक्यातील धोंडराई येथील ग्रामीण भागातून संगीत विशारद शिक्षण घेतलेल्या सिद्धेश्वरी कोकाटे यांच्या स्वरांजली संगीत क्लासेसचा शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई  तालुक्यातील धोंडराई येथील ग्रामीण भागातून संगीत विशारद शिक्षण घेतलेल्या सिद्धेश्वरी कोकाटे यांच्या स्वरांजली संगीत क्लासेसचा शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. संगीत ही माणसाच्या जीवनातील आनंद देणारी आणि जीवन जगवणारी कला आहे. कलेचा वापर केवळ पैसा कमावण्यासाठी नाही तर माणसंही जोडण्यासाठी झाला पाहिजे. पैसा पोटाची भूक तर संगीत हे मनाची भूक भागविते असे प्रतिपादन चिंतेश्वर मठाचे मठाधिपती महंत दिलीप महाराज घोगे यांनी केले.(Swaranjali Music Classes)


         राजवर्धन कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू झालेल्या स्वरांजली संगीत क्लासेसचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह हभप रामदास महाराज, माजी नगरसेविका सौ स्वरूपाताई रोहित पंडित, कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे, पं स सदस्य महादेव औटी, मधुकर आहेर, सरपंच अशोक वंजारे, भागवतराव ढेंबरे, युवासेना तालुका प्रमुख गोविंद दाभाडे, मच्छिंद्र सपकाळ, आर के थोरात, अतुल खरात, विशाल उमाप, शौकतभाई सौदागर, अनिल काकडे, युवराज राजपूत, सुनील कांडेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक रामदास कोकाटे, प्राचार्य सिद्धेश्वरी कोकाटे, अनुपमा कोकाटे, अश्विनी कोकाटे, कांतराव कोकाटे, देविदास कोकाटे, अक्षय कोकाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


यावेळी बोलताना माजी मंत्री बदामराव पंडित म्हणाले की, सिद्धेश्वरी कोकाटे यांनी ग्रामीण भागाततील असतानाही शालेय शिक्षणासोबत संगीताचे शिक्षण घेतले. संगीत विशारद पदवी घेऊन त्यांनी गेवराई संगीत क्लासेस सुरू केले आहेत. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. माणसाच्या जीवनात संगीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेवराईकरांनी या क्लासेसचा लाभ घेऊन आपल्या मुला-मुलींना संगीताचे शिक्षण द्यावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना माजी नगरसेविका सौ स्वरूपाताई पंडित यांनी संगीत क्लासेसच्या प्राचार्य सिद्धेश्वरी कोकाटे यांना "जीवनकलश" हे पुस्तक भेट देऊन, संगीत हे सुखी जीवनाचे खरे सार आहे. ही कला प्रत्येकाने अवगत करणे गरजेचे आहे. संगीत हे मानसिक आधार देण्याचे काम करते. येणाऱ्या काळात या क्लासेसचे विद्यार्थी राज्यात चमकले पाहिजेत त्यासाठी आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही दिली. पुढे बोलताना दिलीप महाराज घोगे म्हणाले की, संगीत हे शेकडो वर्षापासूनची कला असून, यामुळे लाखो माणसांचे जीवन सुखी झाले आहे.

आजही आमची माय माऊली दिवसभर शेतात काबाडकष्ट करून घरी येताना काकडा म्हणते. भक्तीगीते गुणगुणते. त्यामुळे तिचा दिवसभराचा थकवा जातो. पैसा हा पोटाची भूक भागवतो, मात्र संगीत मनाची भूक भागविते. कला ही पैसे कमवण्यासाठी नव्हे तर, जीवन जगण्यासाठी आत्मसात करा, असेही महंत घोगे महाराज म्हणाले. प्राचार्य सिद्धेश्वरी कोकाटे यांनी प्रास्ताविकात या संगीत क्लासेससाठी माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी आम्हाला खूप सहकार्य केले, त्यांच्यामुळेच हा क्लास सुरू होऊ शकला असे सांगितले. यावेळी पत्रकार दिनकर शिंदे, आर के थोरात यांचे समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज करपे यांनी केले तर स्वरांजली क्लासेसच्या संचालक व विद्यार्थिनींनी विविध बहारदार गीते गाऊन सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास संगीतप्रेमी महिला, पुरुष नागरिक उपस्थित होते.(Swaranjali Music Classes)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/