आयु.तारामती रघुनाथ वाघमारे यांनी धम्मप्रसारासाठी स्वःतहा ची मालकी जमीन दिली दान

गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी धर्माच्या प्रचार व प्रसार खेडेगाव पातळीवर धर्माची चळवळ उभी राहण्यासाठी आपण ज्या समाजात, धर्मात वावरतो.

आयु.तारामती रघुनाथ वाघमारे यांनी धम्मप्रसारासाठी स्वःतहा ची मालकी जमीन  दिली दान
Taramati Raghunath Waghmare

आयु.तारामती रघुनाथ वाघमारे यांनी धम्मप्रसारासाठी स्वःतहा ची मालकी जमीन  दिली दान

गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी धर्माच्या प्रचार व प्रसार खेडेगाव पातळीवर धर्माची चळवळ उभी राहण्यासाठी आपण ज्या समाजात, धर्मात वावरतो.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी धर्माच्या प्रचार व प्रसार खेडेगाव पातळीवर धर्माची चळवळ उभी राहण्यासाठी आपण ज्या समाजात, धर्मात वावरतो. त्या समाजाचे वा धर्माचे काही देणं लागतो. या भावनेतून उपासिका व उपासक तारामती रघुनाथ वाघमारे यांनी धम्मकार्यासाठी, धम्माचा प्रसार होण्यासाठी, धम्माचे पालन करण्यासाठी, धम्म म्हणजे काय? हे खेड्यापाड्यातील निराधार, निरक्षर लोकांना धम्माचे आचार विचार माहीत होण्यासाठी यांनी आपली चार गुंठे जमीन ही संघमित्रा बुद्ध विहार किल्लारी येथील ' भन्ते  धम्मसार,  यांच्या मार्गदर्शनाखाली यांना बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी जमीन दान दिली.(Taramati Raghunath Waghmare)

मा.भन्ते धम्मसार यांनी आयु. तारामती रघुनाथ वाघमारे यांनी बुद्ध विहारा साठी विनामूल्य जमीन दान दिल्याबद्दल भन्ते व तलवाडा येथील बौद्ध अनुयाया तर्फे वाघमारे दाम्पत्यांचे आभार मानन्यात आले.यावेळी उपस्थित धम्मसेवक आयु.विजय डोंगरे, जि.प. सदस्य आयु.युवराज तात्या डोंगरे, अशोक आठवले, माऊली नाना डोंगरे, मोहन डोंगरे, सचिन डोंगरे, रमेश आठवले, , प्रशांत डोंगरे, रोहन डोंगरे, महेश आठवले उपस्थित होते.(Taramati Raghunath Waghmare)