संभाजी ब्रिगेड पालघर जिल्हाध्यक्ष पदी तेजस भोईर यांची निवड

जनतेच्या हक्कासाठी लढणारा तेजस भोईर यांची संभाजी ब्रिगेड पालघर जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली

संभाजी ब्रिगेड पालघर जिल्हाध्यक्ष पदी तेजस भोईर यांची निवड
Tejas Bhoir elected as Sambhaji Brigade Palghar District President

संभाजी ब्रिगेड पालघर जिल्हाध्यक्ष पदी तेजस भोईर यांची निवड

 

   विद्यार्थी व तरुणांच्या न्याय हक्कासाठी झुंझणारा व गोरगरिब जनतेच्या मदतीला धावुन येणारा, जनतेच्या हक्कासाठी लढणारा  तेजस भोईर यांची संभाजी ब्रिगेड पालघर (Sambhaji Brigade Palghar) जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) केंद्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीमध्ये महाराष्ट्रातील (maharashtra) सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्त्या करण्यात आल्या, सदर बैठकीत शिवश्री तेजस भोईर यांनी २०१७ पासुन केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तेजस भोईर हे गेल्या ०६ वर्षापासुन मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होते.नुकतीच जानेवारी- २०२० मध्ये झालेली वाडा पंचायत समितीमधुन निवडणुक देखील संभाजी ब्रिगेडकङुन लढवली होती.अशा विविध कार्यकारणीची दखल घेत व जनतेच्या विकासासाठी तत्पर सेवेत राहणारे तेजस भोईर यांची जयवंत भोईर यांच्या जागेवर पालघर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
 

विक्रमगड

प्रतिनिधी - अजय लहारे

________

Also see: अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरआधी घ्या....

https://www.theganimikava.com/supreme-court-decides-to-held-the-last-year-examination-before-30-September