‘मंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र उभे केले आहे....

‘मंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र उभे केले आहे. राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे दि. 13 ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात आले, भारतीय जनता पार्टी तर्फे या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
याच संदर्भात भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका तर्फे जुना मोटार स्टँड येथील श्री हनुमान मंदीरा समोर आंदोलन करण्यात आले. मा. संतोष जाधव (तालुका अध्यक्ष भाजपा) म्हणाले, गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत याकरिता भाविकांनी अनेकवेळा मागणी केली, राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट राज्यात मदिरेचे बार उघडण्यात आले. ‘मंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’,
अशी अवस्था झाली आहे. विविध संप्रदायाचे साधु-संत, धर्माचार्य, पुरोहित आंदोलनात सहभागी झाले. फूल-प्रसाद विक्रेते, मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी उपस्थित भरतशेठ मुळे, संतोष जाधव, उज्वला निकम, निलेश नलावडे, प्रियांका साबळे, महेश बर्गे, बबनराव कांबळे, निलेश जगताप, सुनिल वाघ, सुनिल निदान, सोमनाथ शिंदे, संदिप केंजळे, अॕड. अमोल भुतकर, निलेश यादव, अमोल माने, विजय ओसवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मा. उज्वला निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सातारा
प्रतिनिधी - उमेश चव्हाण
__________
Also see : शालेय शिक्षणासोबतच मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक – डॉ. जे पी शुक्ला