दांडी येथील 'हिरा देवी' ही बोट बुडता-बुडता वाचली, मदतीला आले मच्छिमार धावून

पालघर तालुक्यातील दांडी येथील कवीचे मच्छिमार सुखदेव आरेकर हे बुधवारी आपली हिरा देवी बोट घेऊन समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते.

दांडी येथील 'हिरा देवी' ही बोट बुडता-बुडता वाचली, मदतीला आले मच्छिमार धावून
The boat 'Hira Devi' from Dandi survived by drowning. Fishermen came to the rescue.

दांडी येथील 'हिरा देवी' ही बोट बुडता-बुडता वाचली, मदतीला आले मच्छिमार धावून

     

पालघर तालुक्यातील दांडी येथील कवीचे मच्छिमार सुखदेव आरेकर हे बुधवारी आपली हिरा देवी बोट घेऊन समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र बोटीला मागून भगदाड पडल्याने पाणी शिरून ही बोट बुडू लागली असता बोटीवरील मच्छिमारांनी अपल्या जवळ असलेल्या भ्रमणध्वनी वरून इतर मच्छिमारांशी संपर्क साधला. थोड्याच वेळात दांडी येथील विठ्ठल आरेकर यांची कल्पतरू तर राजेंद्र पगधारे यांची अमर लक्ष्मी या दोन नौका घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली असून नौकेवरील पाच खलाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. 
      मासेमारी करत असताना संध्याकाळच्या सुमारास बोटीच्या मागील पंख्याला दोरखंड अडकल्यामुळे खलाशांपूढे दोरखंड काढण्याची मोठी समस्या निर्माण झाली. पंख्याला अडकलेल्या दोरखंडाला खेचून काढण्याच्या प्रयत्नाने बोटीच्या मागील बाजूस मोठे भगदाड पडल्याने ही नौका बुडू लागली. आपल्याला मदत मिळावी म्हणून नौकेवरील मच्छिमारांनी भ्रमणध्वनी वरून इतरत्र संपर्क साधला असता तात्काळ त्यांच्या मदतीला दांडी येथील मच्छिमार आल्याने जीवितहानी न होता सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दुर्घटना ग्रस्त नौकेला दोरखंडाने बांधून किनाऱ्यालगत आणण्यात मदतीसाठी गेलेल्या मच्छिमारांना यश आले आहे. बुडणाऱ्या नौकेतील मासेमारीसाठी लागणाऱ्या सर्व डोली व जाळे समुद्रात वाहून गेल्याचे नौका मालक सुखदेव आरेकर यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागाने दुर्घटना ग्रस्त नौका मालकाला शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस कुंदन दवणे यांनी केली आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील