कुंदे येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

ग्रामस्थांची पंचायत समितीकडे तक्रार

कुंदे येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
The construction of sub-health center at Kunde is of inferior quality
कुंदे येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
कुंदे येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
कुंदे येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

कुंदे येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

ग्रामस्थांची पंचायत समितीकडे तक्रार

कल्याण (kalyan): ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कल्याण तालुक्यातील मौजे कुंदे येथे आमदार किसन कथोरे यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी उप आरोग्य केंद्र मंजूर केलेले आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे सुरु असलेले बांधकाम हे निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याबाबत त्यांनी पंचायत समितीकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

       या आरोग्य केंद्राच्या बांधकामाकडे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले असून त्यामुळे इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या इमारतीचा स्ल्याब पहिल्याच पावसात ठिबक सिंचनाप्रमाणे गळत आहे. तसेच भिंती व इतर कामे सुद्धा निकृष्ट दर्जाची झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  बांधकाम विभागाच्या  अधिकाऱ्यांचे हात संबंधित ठेकेदाराने ओले केल्यामुळे या निकृष्ट बांधकामाचे बिल वेळोवेळी    अदा करण्यात आलेले आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने उप आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही या ग्रामस्थांनी केला आहे.

       निकृष्ट दर्जाचा स्ल्याब पूर्णपणे तोडून पुन्हा न बांधल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पावसाच्या पाण्यात गळत असलेला स्ल्याब व निकृष्ट भिंतीचे पुन्हा बांधकाम करून घ्यावे व या निकृष्ट बांधकामाची चौकशी तपासणी करून शासनाचा खर्च झालेल्या लाखो रुपयांची वसुली करण्याची मागणी सुरज शेलार, राजेश शेलार, दिपक शेलार आदींसह इतर ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली आहे.

       दरम्यान याबाबत  पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील उपअभियंता संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, वॉटर प्रुफिंगचे काम योग्य न झाल्याने ही गळती झाली असून याबाबत संबंधित ठेकेदाराला याआधीच सूचना केल्या असून, हे काम झाल्यानंतरच संबंधितांचे बिल देण्यात येईल असे सांगितले.

कल्याण, ठाणे  

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

_______

Also see : केस गळती थांबवणे ते स्मरणशक्ती वाढवणे : जास्वंद फुलाचे हे थक्क करणारे फायदे...!!

https://www.theganimikava.com/Know-the-benefits-of-Hibiscus-Sabdariffa