खवा व्यापाऱ्यांनी घेतली अप्पर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट
पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल मानले आभार...

खवा व्यापाऱ्यांनी घेतली अप्पर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट
पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल मानले आभार
कल्याण (kalyan) : कल्याण खवा व्यापारी संघटनेच्या वतीने नुकतेच २१ वे स्नेहसंमेलन पार पडले, त्यात अनेक विषयांवर ठराव मंजूर होऊन त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ विवेक पानसरे यांची कल्याण व्यापारी असो. अध्यक्ष प्रकाश मुथा, जयदीप सानप, जफर शेख, सागर पगारे, राजा जाधव, लखपत राजपूत, पुरुषोत्तम खंडेलवाल, रमदुलारे सिंह, प्रशांत धनावडे आदींनी भेट घेऊन व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी तसेच काही ब्लॅकमेलर, खोटे खबरीदार, गैरसमज करणारे समाजकंटक यांची माहिती दिली.
जे व्यापारी आणि पोलिस यांच्यामध्ये असली, नकली खवा असा तांत्रिक वादविवाद उभे करतात लालचे पोटी अश्याच प्रकरणी पालघर जिल्ह्यातील बोगस पत्रकारा विरोधात वाडा पोलीस स्टेशन 30/2020 कलम 385,416 प्रमाणे खंडणी गुन्हा दाखल बाबत माहिती देण्यात आली. तलासरी, वाडा, मनोहर, कुडुस, अंबाडी, गणेशपुरी या ठिकाणी पोलीस आणि व्यापारी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून पोलीस खाते बदनाम करीत होता. तसेच व्यापारी यांच्यावतीने सर्व अधिकृत कागद पत्रासह निवेदन देण्यात आले. त्यावर कठोर कारवाई करून व्यापारी यांना आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी दिले.
तर आतापर्यत व्यापाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, ठाणे सह पोलीस आयुक्त कुंभारे, भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह, पालघर उप अधीक्षक नाईक, ठाणे ग्रामीण उपअधीक्षक गोडबोले, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, सहाय्यक पोलीस उपायुक्त वाहतूक दिलीप उगले, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे व.पो.नि. नारायण बानकर, पो.नी जाधव, कोळसेवाडी पोलीस स्टेशन व.पो.नि. शाहूराजे साळवे, एपीआय किरण वाघ, भिवंडी वाहतूक व.पो.नी मायने, भिवंडी तालुका रामभाल सिंह, कल्याण वाहतूक शाखेचे व.पो.नि. सुखदेव पाटील, उल्हासनगरचे वाहतूक व.पो.नि. धरणे, तलासरी व.पो.नी वसावे, दराडे मनोहर, वाडा येथील सूर्यवंशी, रवींद्र नाईक, कोंनगाव पो.नी साबळे आदींसह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे व्यापारी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी जयदीप सानप यांनी दिली.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
________
Also see : कल्याण डोंबिवलीत २९६ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
https://www.theganimikava.com/296-new-patients-and-7-deaths-in-Kalyan-Dombivali