कल्याण डोंबिवलीत  कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार

२५१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू ४७,१४९ एकूण रुग्ण तर ९३० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १२५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत  कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार
The number of corona patients in Kalyan Dombivali has crossed 47,000

कल्याण डोंबिवलीत  कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार

२५१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

 ४७,१४९ एकूण रुग्ण तर ९३० जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत १२५ रुग्णांना डिस्चार्ज

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार गेली असून आज नव्या २५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत  १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या २५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४७,१४९ झाली आहे. यामध्ये ३११९ रुग्ण उपचार घेत असून ४३,१०० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४४, कल्याण प – ७९, डोंबिवली पूर्व ७२, डोंबिवली प- ४६, मांडा टिटवाळा – ३, तर मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४८ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_____________

Also see : 'वनराई’च्या मोहन धारिया यांच्या आठवणींना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये उजाळा

https://www.theganimikava.com/Reminisce-about-Mohan-Dharia-of-Vanrai-at-Suryadatta-Group-of-Institutes