स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 

योगेश्वरी शिक्षन  संस्था संचलित योगेश्वरी महाविद्यालयाचे 30 वर्षा पासुन कार्यरत प्रा. डॉ. सुरेंद्र भिवगडे यांच्या वर खोटे आरोप करून निलंबित केले होते...

स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 
The suspended professor got justice due to Swabhimani Mupta organization
स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 
स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 
स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 
स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 
स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 

स्वाभिमानी मुप्टा संघटनेमुळे निलंबित प्राध्यापकाला मिळाला न्याय 

इतर 14 प्राध्यापक कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

योगेश्वरी शिक्षन  संस्था संचलित योगेश्वरी महाविद्यालयाचे 30 वर्षा पासुन कार्यरत प्रा. डॉ. सुरेंद्र भिवगडे यांच्या वर खोटे आरोप करून निलंबित केले होते. हे प्रकरण विद्यापीठ व महाविद्यालय  न्यायाधिकरण औरंगाबाद येथे त्यांच्या बाजूने निकाल लागला. स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष  डॉ. शंकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण विद्यापिठ न्यायालयात पाठवले न्यायालयात फक्त 15 दिवसाच्या आत या प्रकरणाची सुनावणी होऊन यामध्ये न्यायालयाने प्रा.डॉ.सुरेंद्र भिवगडे यांच्या बाजूने निकाल दिला आहे व संस्थेला एक हजार  रुपये दंड ठोठावला आहे. योगेश्वरी महाविद्यालयां मध्ये मॅनेजमेंटचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यामुळे याच्या अगोदर जवळपास या महाविद्यालयातील 14  प्राध्यापक व कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील एकमेव असे हे उदाहरण सांगता येईल, या संस्थेमध्ये,  संस्था चालक यांनी प्राचार्य डॉ. उदय जोशी यांना हाताशी धरून हेतुपुरस्सर बहुजन मागासवर्गीय प्राध्यापक कर्मचाऱ्यांना त्रास देऊन वेगवेगळ्या प्रकरणात षडयंत्र करून नियोजन पुर्वक पद्धतीने संस्थेमधून काढतो निलंबित करतो सक्तीच्या रजेवर  पाठवतो अशी जवळपास 14 उदाहरणे या संस्थेमध्ये घडली आहेत. शिक्षणा सारख्या पवित्र असणाऱ्या क्षेत्रातील  तीस वर्ष सेवा देणाऱ्या . प्रा डॉ भिवगडे यांच्या वर विनयभंगाचा सारखे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना संस्थेतून काढले होते  व काहीना  काढले आहे एकूण 14 जण या अशा खोट्या नाट्या आरोपामुळे संस्थेतून निलंबित केले गेले आहेत.  त्यापैकी काही जणांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत व ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु एका सभ्य सुसंस्कृत समाजामध्ये प्राध्यापक म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने संस्था वागणूक देत आहे. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांवर प्रशासक नेमावा अशी मागणी स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ शंकर अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या कुलगुरू पुढे करण्यात येणार आहे. योगेश्वरी कॉलेजचे प्राचार्य उदय जोशी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संस्थाचालक अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे हे अशा पद्धतीने खोटेनाटे कारस्थाने करून संस्थेतील बहुजन मागासवर्गीय प्राध्यापकांना त्रास देत आहेत व त्यांना निलंबित करून घरी बसवत आहेत. जर अशाच प्रकारचे प्रकरणे या संस्थेत घडली तर संस्थेच्या प्राचार्य उदय जोशी विरुद्ध अधिकृतपणे मागासवर्गीय बहुजन समाजाला त्रास दिल्या  कारणाने गुन्हा नोदविण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. सुरेंद्र भिवगडे  स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे प्रोफेसर डॉ शंकर अंभोरे व बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.धम्मपाल घुंबरे, बामुप्टोचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड, डॉ. भगवान, घवाडे, प्रा,मारुती तेगमपूर  बाळासाहेब लिहिणार प्रा डॉ शफिक शेख प्रा डॉ शांताराम रायपुरे पुरोगामी शिक्षण संघटनेचे प्रा. चव्हाण, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे विक्रम धनवे, राजाभाऊ कोरडे, डॉ संजय सावते प्रा. झिंजुर्डे, डॉ. हिरवे, डॉ पाटेकर, विविध शिक्षक संघटनेचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणागत

_________

Also see: धावत्या ट्रकला भीषण आग; केमिकल पावडरसह संपूर्ण साहित्य खाक, वसई-भिवंडी मार्गावरील घटना

https://www.theganimikava.com/fierce-fire-on-running-truck-incident-on-vasai-bhiwandi-road-all-products-destroyed-along-with-chemical-powder