५०० रुपयांच्या वादातून वाईनशॉप मँनेजरला कात्रीने भोसकले

कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील म्हारळ येथे  ५०० रुपयांच्या वादातुन तळीरामाने वाईन शॉपमध्ये घुसुन मँनेजरला कात्रीने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे...

५०० रुपयांच्या वादातून वाईनशॉप मँनेजरला कात्रीने भोसकले

दुकानातील थरार सीसीटीव्हीत कैद

कल्याण (Kalyan) : कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील म्हारळ येथे  ५०० रुपयांच्या वादातुन तळीरामाने वाईन शॉपमध्ये घुसुन मँनेजरला कात्रीने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर नजीक असलेल्या म्हारळ गावात दोन दिवसापूर्वी घडली. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण तालुका पोलिसांनी हल्लेखोर आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन त्याला अटक केली आहे. गोविद वर्मा असे अटकेत असलेल्या हल्लेखोर तळीरामाचे नाव आहे. तर लच्छु आहुजा (३६) असे गंभीर जखमी झालेल्या वाईन शॉप मँनेजर नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमध्ये रहाणारे लच्छु आहुजा हे रोझ वाईनशॉप या देशी विदेशी दारू विक्रीच्या दुकानात मँनेजर म्हणून काम पाहतात. या वाईन शॉपमध्ये दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या ८.३०च्या सुमारास दुकान बंद करण्याच्या समयी आरोपी गोविद वर्मा हा साथीदारांसह दारू खरेदीसाठी आला होता. त्यावेळी ५०० रुपयांच्या बिलावरून  मँनेजर  विजय आहुजा आणि आरोपी गोविद यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपीने धारदार कात्री  घेऊन वाईन शॉपमध्ये घुसला. दरम्यान यांचा वाद सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या मँनेजर लचु आहुजा यांच्या पोटात कात्री भोसकली. हे पाहून वाईन शॉप मधील इतर कामगारांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातात धारदार कात्री असल्याने त्याने साथीदारासह पोबारा केला.

दरम्यान, घटनेची माहिती कल्याण तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला. बुधवारी आरोपीला शहाड परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे, बजरंग राजपूत करीत आहेत.

कल्याण, ठाणे 
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

________

Also see : अंध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत

https://www.theganimikava.com/Helping-blind-people-with-essentials