बॉक्सर सतीश कुमारचा सामना सुरु होणार, भारताला पदकाची आशा

कांस्यपदकासाठी खेळणाऱ्या पीव्ही सिंधूवर भारतीय चाहत्यांच्या नजरा असतील. शनिवारी तिने उपांत्य फेरीचा सामना गमावला होता.

बॉक्सर सतीश कुमारचा सामना सुरु होणार, भारताला पदकाची आशा
Tokyo Olympics 2020

बॉक्सर सतीश कुमारचा सामना सुरु होणार, भारताला पदकाची आशा

कांस्यपदकासाठी खेळणाऱ्या पीव्ही सिंधूवर भारतीय चाहत्यांच्या नजरा असतील. शनिवारी तिने उपांत्य फेरीचा सामना गमावला होता.

टोकियो ऑलिम्पिकमधील शनिवारचा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. आणखी एक भारतीय महिला हॉकी संघ आणि डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरच्या विजयाने भारतीयांना आनंद दिला. तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीतील बॉक्सर अमित पंघाल आणि स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या पराभवामुळे चाहत्यांच्या सुवर्ण पदकाच्या आशा मावळल्या. आज भारत जास्त सामने खेळणार नाहीय. गोल्फ आणि घोडेस्वारी व्यतिरिक्त, आज बॉक्सर सतीश कुमार आपला उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.(Tokyo Olympics 2020 Live)

उपांत्यपूर्व फेरीत, सतीशचा सामना उझबेकिस्तानच्या बखोदिर जलोलोवशी होणार आहे. जलोलोव्हने अझरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेवचा 5-0 असा पराभव केला होता.ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमारने पहिल्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन्ही बॉक्सर्ससाठी हे पहिले ऑलिम्पिक आहे.

रविवारी, टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या नवव्या दिवशी, भारतातील खेळाडू पाच वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होताना दिसतील. यापैकी दोन खेळांमध्ये भारताला पदके मिळू शकतात.पदकाच्या इनुषंगाने भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज भारताची पीव्ही सिंधू कांस्य पदकाचा सामना खेळणार आहे. तिच्याकडून भारतवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत.

सतीश कुमार तीनही राउंड हरला आहे. सतीश कुमार शेवटचा राऊंड 0: 5 ने हरला. पदकाच्या शर्यतीतून तो आता बाहेर पडला आहे. सतीश कुमार सगळ्या मॅचमध्ये कधीही विजयाच्या स्थितीत दिसला नाही. टॉपसीडसमोर जखमी सतीशने हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिला पण अखेर त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.भारतीय पुरुष हॉकी संघ आज ग्रेट ब्रिटेन संघाविरुद्ध क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात उतरणार आहे.(Tokyo Olympics 2020)

भारतीय हॉकी संघाने 1980 नंतर अद्यापर्यंत ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही. पण भारताला यंदा ही संधी आहे.