भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

ग्रुप स्टेजमध्ये केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना पराभूत झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला नमवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली.

भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास
Tokyo Olympics 2020

भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

ग्रुप स्टेजमध्ये केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना पराभूत झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला नमवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली.

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे. कोच ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली तब्बल 49 वर्षानंतर भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 1980 सालच्या मॉस्को ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघांनं अखेरचं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यावेळच्या ऑलम्पिकमध्ये हॉकी खेळात 6 संघ असल्यानं राऊंड रॉबिन नंतर पहिल्या दोन संघात फायनल झाली होती.(Tokyo Olympics 2020) 

आज झालेल्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेन संघाला 3-1 ने नमवत भारतीय संघाने हे यश मिळवलं आहे. आता विश्व चॅम्पियन असणाऱ्या बेल्जियम संघासोबत भारतीय संघ भिडणार आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये 1-7 ने पराभव मिळवल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत सलग 4 सामने जिंकत सेमीफायनमध्ये जागा मिळवली आहे. सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्येच आघाडी घेत  ब्रिटनला मागे टाकलं. ज्यानंतर अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सामना खिशात घातला.


पहिल्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ दाखवला.  टीम इंडियाने दोन्ही क्वॉर्टरमध्ये एक-एक गोल केला. आधी 7 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताला 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 16 व्या मिनिटाला गुरजंत सिंगने आणखी एक गोल करत 2-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरच्या अंती भारत 2-0 च्या आघाडीवर होता.


तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी चुरशीची टक्कर दिली. ब्रिटन संघाकडून आक्रमण झाली पण भारतीय डिफेन्सने तगडा खेळ दाखवला. ब्रिटेनने 3 पेनल्टी कॉर्नर घेतले ज्यात एक प्रयत्न यशस्वी झाल्याने त्यांनी 2-1 ने सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र भारताने एकही संधी दिली नाही. उलट 57 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने एक गोल करत भारताला 3-1 ची विजयी आघाडी मिळवून दिली.(Tokyo Olympics 2020) 

विजयासह 1980 नंतर प्रथमच भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.