भारत 2-1 ने आघाडीवर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे लागल्या आहेत.

भारत 2-1 ने आघाडीवर
Tokyo Olympics 2020

भारत 2-1 ने आघाडीवर

 टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे लागल्या आहेत.

टोकिया ऑलिम्पिकमधील सोमवारचा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली, तर कमलप्रीत कौरलाही फारशी चमक दाखवता आली नाही. आज भारतीय चाहते भारतीय पुरुष हॉकी संघाकडून आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा करतील. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा असतील ज्यातून भारताला पदकाची आशा आहे.(Tokyo Olympics 2020)

आज युवा कुस्तीपटू सोनम मलिक मैदानात उतरेल. दिवसाच्या शेवटी, तेजिंदरसिंग तूर शॉटपुटच्या क्वालिफिकेशनमध्ये आव्हान देईल.मॅचच्या सातव्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने शानदार ड्रॅग फ्लिक करुन गोल केला त्याचबरोबर भारताचं खातंही उघडलं.बेल्जियमचा संघ अधिक पास करून भारताच्या बचावावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत दडपणाखाली दिसत आहे.


सामन्याच्या अगदी सुरुवातीला बेल्जियमने पेनल्टी कॉर्नर घेतला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जियमच्या लुपर्टने पहिल्या पीसीवर गोल करुन आपल्या संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमला ​​पेनल्टी कॉर्नर देण्यापासून भारताला परावृत्त करावे लागेल.


बेल्जिअमला नमवून सेमी फायनल जिंका आणि मेडल पक्कं करा, अशी अपेक्षा देशवासिय भारतीय हॉकी संघाकडून करत आहेत.सेमी फायनलमध्ये भारताची गाठ पडलीय ती बेल्जिअमसोबत… तब्बल चार दशकानंतर भारताने सेमी फायलन गाठलीय त्यामुळे मॅच जिंकून पदक कोण पक्कं करणार?, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे.टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे लागल्या आहेत.(Tokyo Olympics 2020)

थोड्याच वेळात भारतीय टीम सेमी फायलन मॅच खेळण्यासाठी उतरणार आहे.