मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर
Uddhav Thackeray Kolhapur visit

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील  पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा यापूर्वी हवामान विभागानं कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिल्यानं रद्द करण्यात आला होता.  सकाळी 8.40 वाजता मुख्यमंत्री कोल्हापूरकडे जाण्यासाठी मातोश्री निवासस्थानावरुन निघतील.(Uddhav Thackeray Kolhapur visit)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टरीय विमानतळ, सांताक्रूझकडे रवाना होतील. विमान तळावरुन कोल्हापूरला जातील. कोल्हापूर विमानतळावरुन मोटारीने शिरोळ-नृसिंहवाडी रोडकडे रवाना होतील. शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. त्यानंतर शाहूपूरी ६वी गल्ली, कोल्हापूर नाईक कंपनी येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करतील.

त्यानंतर पंचगंगा हॉस्पीटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथील पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. कोल्हापूरमधील पूरबाधित भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 ते 1.30 पर्यंत करतील.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता कोल्हापूरमधील पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. उद्धव ठाकरे दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होतील.

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं सुमारे 66 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.

कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला आहे. पुराचे पाणी ओसारल्याने ठिक ठिकाणी भराव वाहून गेल्याचे चित्र आहे. भराव वाहून गेल्याने पुढील काही दिवस मिरज-कोल्हापूर रेल्वेसेवा बंद राहणार आहे. एक किलोमीटरवरील भराव वाहून गेला आहे.(Uddhav Thackeray Kolhapur visit)

पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार आहे.