म्हैस दोनदा दूध देते, संध्याकाळीही दुकानात दूध विक्री करु द्या

म्हैस दोनदा दूध देते, संध्याकाळीही दुकानात दूध विक्री करु द्या, कृपाशंकर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र.

म्हैस दोनदा दूध देते, संध्याकाळीही दुकानात दूध विक्री करु द्या

म्हैस दोनदा दूध देते, संध्याकाळीही दुकानात दूध विक्री करु द्या

The buffalo gives milk twice, let the milk be sold in the shop even in the evening

म्हैस दोनदा दूध देते, संध्याकाळीही दुकानात दूध विक्री करु द्या, कृपाशंकर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

म्हैस दोनदा दूध देत असते. हे ताजे दूध सर्व दुकानदारांना पाठवले जाते. कोणताही रिटेलर संध्याकाळी दूध घेत नाही, कारण दुकानं बंद असतात. त्यामुळे सरकारने संध्याकाळीही दूध विकायला परवानगी द्यावी” अशी मागणी उत्तर भारतीय समाजाचे नेते कृपाशंकर सिंग  यांनी केली आहे. कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र लिहून कौतुक केलं.

तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मी राज्य सरकार, बीएमसी प्रशासनाचे या कौतुकास्पद प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो. तसेच काही सूचनाही सुचवतो” असं कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रात लिहिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. दूध उत्पादन गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो. म्हैस दोनदा दूध देत असते आणि हे ताजे दूध सर्व दुकानदारांना पाठवले जात असते. कोणताही रिटेलर संध्याकाळी दूध घेत नाही, कारण दुकानं बंद असतात. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि दूध संध्याकाळी विकायला परवानगी द्यावी” अशी मागणीही कृपाशंकर सिंग यांनी केली आहे.

या कोरोना काळात वृत्तपत्र आणि टीव्ही मीडिया पत्रकार मोठं काम करत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्ध्यांचा सन्मान द्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली. महाराष्ट्र सरकारने एप्रिलमध्ये ऑटो रिक्षावाल्यांना 107 कोटीचे पॅकेज घोषित केले होते त्यानुसार प्रत्येकी 1500 रुपये रिक्षा चालकांना मिळणार होते ते अजून मिळाले नाहीत. ते लवकर मिळावेत, अशी मागणीही कृपाशंकर सिंग यांनी केली.

सरकारने गरीब लोक जसे की कारपेंटर, कुली यांना जे 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले आहे, ते पुरेसे नाही.

त्यांना किमान खाद्यतेल, मीठ, हळद, साबण याही गोष्टी द्याव्यात. नाहीतर कमीत कमी 5000 रुपये द्यावेत. मला वाटत की तुम्ही या मागण्यांकडे लक्ष द्याल, अशी अपेक्षा कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केली.