केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. त्यांचा मुलगा चिराग पासवान याने ट्विट करत आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
Union Minister Ram Vilas Paswan passes away

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

पुणे पिंपरी (Pune Pimpri): लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. त्यांचा मुलगा चिराग पासवान याने ट्विट करत आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. एनडीएमधील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून लोजपची ओळख आहे. ७४ वर्षीय पासवान मागच्या महिन्याभरापासून उपचार घेत होते. चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये भावनिक संदेश देताना म्हटले की, “पप्पा, तुम्ही या जगात नाहीत. पण मला माहितीये तुम्ही जिथे असाल तिथून आमच्या सोबत आहात.”

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत सांगितले की, “मला किती दुःख झालंय हे मी शब्दात सांगू शकत नाही. पासवान यांच्या जाण्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले असून मी एक मित्र, चांगला सहकारी आणि गरिबांनी स्वाभिमानी वृत्तीने जगावे म्हणून झटणारा एक चांगला माणूस गमावला आहे.”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवर पासवान यांना श्रद्धांजली व्यक्त केली.रामविलास पासवान हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक होते. संसदीय कामकाजाचा जवळपास ५ दशकांचा अनुभव त्यांच्याकडे होता. ९ वेळा लोकसभेचे सदस्य तर २ वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले. पासवान हे हवेची दिशा ओळखून आपले राजकारण करायचे. कधी ते काँग्रेसच्या विरोधात जायचे तर कधी युपीएमध्ये येत मंत्री व्हायचे. तर कधी काळी भाजपवर टीका करणारे पासवान एनडीएमध्ये सामील होत २०१४ पासून मंत्री झाले.

पिंपरी,पुणे 
प्रतिनिधी -आत्माराम काळे 

_________

Also see : पालघर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीस  पदी अंजली कुडू यांची नियुक्ती

https://www.theganimikava.com/Appointment-of-Anjali-Kudu-as-General-Secretary-of-Palghar-District-BJP