महिलेला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची ठाणे पोलीस आयुक्तांना सूचना...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाची व महाराष्ट्र महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन यांची मा.आठवले यांची भेट...
शीतल बनसोडे या दलीत रिक्षाचालक महिलेला मारहाण करणाऱ्या दिवा येथील शिवसेनेच्या नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची ठाणे पोलीस आयुक्तांना सूचना !!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाची व महाराष्ट्र महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन यांची मा.आठवले यांची भेट
आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदास आठवले यांनी दिवा येथे झालेल्या दलित रिक्षाचालक शितल बनसोडे या महिलेवर अत्याचार व मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक अमर पाटील व त्याच्या सहकाऱ्यांना तत्काळ ॲट्रॉसिटी गुन्ह्याखाली व विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्याची ठाणे पोलीस आयुक्तांना सूचना दिली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचे आदेश यासंदर्भात.उद्या दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी संबंधित गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्या साठी व त्याच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना संरक्षण देणारे समाजसेवक अमोल केंद्रे यांना सुद्धा संरक्षण देण्यात यावे या मागणी साठी दुपारी बारा वाजता रिपाईचे शिष्टमंडळ ठाणे पोलीस आयुक्त यांना भेटणार आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे ठाणे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे महासचिव सिद्धार्थ काळे. दिंडोशी तालुका अध्यक्ष वृंदावन शिंदे . शितल बनसोडे यांच्या समवेत ठाणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. यावेळी संविधान बंगल्यावर भीम आर्मी चे अशोक कांबळे . व त्यांचे सहकारी समाजसेवक अमोल केंद्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस शीलाताई गांगुर्डे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल गांगुर्डे , उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे
___________
Also see : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाच्या अध्यक्षपदी दत्ता वाकसे यांची नियुक्ती करा...!