अन्याय, अत्याचार कराल तर ॲट्रॉसिटी होणारच

महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनुसूचित जाती जमाती वर अन्याय अत्याचार वाढले पत्रकार परिषद मध्ये बाबुराव पोट भरे यांची गर्जणा.

अन्याय, अत्याचार कराल तर ॲट्रॉसिटी होणारच
Vanchit Bahujan Aghadi

अन्याय, अत्याचार कराल तर ॲट्रॉसिटी होणारच.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनुसूचित जाती जमाती वर अन्याय अत्याचार वाढले  पत्रकार परिषद मध्ये बाबुराव पोट भरे यांची गर्जणा.

बीड येथे काल बहुजन विकास मोर्चा च्या झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना काळात खासगी डॉक्टरांकडून झालेली सर्वसामान्य नागरिकांची लूट, भूमाफियांचा सुळसुळाट, वनीकरण विभाग आणि कृषी विभागाकडे करोडो रुपयेविविध योजनेसाठी आले मात्र अशा माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यावर मात्र कोणाचेच नियंत्रण नसून जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधक हे भाऊ - भाऊ आणि सगळं मिळून खाऊ याप्रमाणे काम सुरू असल्याचा आरोप बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे यांनी केला.


पत्रकार परिषदेत बोलताना पोटभरे यांनी जिल्ह्यातील अनेक मुद्यांकडे लक्ष वेधत म्हणाले की,बीड आणि माजलगाव मधील नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. यादरम्यान मोठा पाऊस झाला आहे.त्यामुळे लहान मोठे सर्व धरणे भरले आहेत जर हे धरणं फुटले तर स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.याला सर्वस्वी नगर परिषद आणि महसूल खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्याची अवस्था आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी झाली आहे. वनीकरण विभाग आणि कृषी विभागाकडे विविध योजनेसाठी करोडो रुपये आले मात्र एकही रुपयाचे काम झाले नाही, एक ही योजना राबवली नाही फक्त सर्व सामान्य माणसाचे आणि शेजाऱ्यांच्या खिशातील पैसे कापण्याचे काम केले जात आहे. सर्वात जास्त भूमाफिया बीड जिल्ह्यात आहेत.मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करण्याचे प्रकार बीड जिल्ह्यात होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जरी एकमेकांचे विरोधक असेल तरी जमिनीच्या बाबतीत एकत्र येऊन आपण दोघं भाऊ - भाऊ आणि सगळं मिळून खाऊ याप्रमाणे गोर गरीब लोकांच्या जमिनी हडप करून करोडो रुपये कमवत असल्याचे पोटभरे यांनी सांगितले.

अन्याय अत्याचार कराल तर ॲट्रॉसिटी होणारच

बीड जिल्ह्यात ॲट्रॉसिटी चे प्रमाण वाढत आहेत यावर बोलताना बाबुराव पोटभरे म्हणाले की, जिल्ह्यात ॲट्रॉसिटी वाढण्याची एकमेव कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार. २०१४-२०१९ या कालावधीत जेवढ्या ॲट्रॉसिटी झाल्या त्यापेक्षा अधिक ॲट्रॉसिटी हे सरकार आल्यावर झाल्या आहेत.त्या केसेस खऱ्या की खोट्या हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला - तुम्हाला नसून न्यायालयाला आहे आणि न्यायालय जे निर्णय देईन त्याचे स्वागतच करू.मात्र अलीकडच्या काळात अनुसूचित जाती जमाती वर अन्याय अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. जिल्ह्यात जातीच्या नावावर अन्याय अत्याचार होत असतील तर ही बाब गंभीर आहे. ॲट्रॉसिटी आमची कवचकुंडल आहे, आम्ही त्याचा वापर अत्याचाराच्या विरोधात करणारच. जर कोणी अनुसूचित जाती आणि जमाती वर अन्याय अत्याचार केला तर त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी होणारच. अन्याय अत्याचार करू नका ॲट्रॉसिटी होणार नाही असे ठणकावून सांगत खोट्या आणि चुकीच्या ऍट्रॉसिटीचा समर्थन कधीच करणार नसल्याचेही बाबुराव पोटभरे यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत ससाने श्रीहरी मोरे,सुमित डोंगरे विनोद शिंदे, बाबासाहेब वाघमारे, जयदीप तांगडे, नवनाथ धाईजे मंचावर उपस्थित होते.


बीड जिल्हा प्रतिनिधी

विश्वनाथ शरणांगत