वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने घेतली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट

सांगली जिल्हा यांच्या मार्फत मागणी करण्यात येते की,सांगली मिरज आणि कुपवाड शहर मिळून संयुक्तपणे महानगरपालिका आहे.

वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या  शिष्टमंडळाने घेतली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट
Vanchit Bahujan Aghadi

वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या  शिष्टमंडळाने घेतली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट

सांगली जिल्हा यांच्या मार्फत मागणी करण्यात येते की,सांगली मिरज आणि कुपवाड शहर मिळून संयुक्तपणे महानगरपालिका आहे. 

सांगली प्रतिनिधी जगन्नाथ सकट
दि. ४ सप्टेंबर २०२१

उपरोक्त विषयास अनुसरून आपणाकडे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या मार्फत मागणी करण्यात येते की,सांगली मिरज आणि कुपवाड शहर मिळून संयुक्तपणे महानगरपालिका आहे. कुपवाड शहारात स्वातंत्र्य सैनिक,कलावंत,तसेच शिक्षण महर्षी जन्माला आले आहेत, कुपवाड शहर हे विविध कलागुणाने नटलेले शहर  म्हणून पूर्वी पासून परिचय आहे. कुपवाड शहर हे महानगरपालिकेत समाविष्ट केले पासून सांगली व मिरज या दोन्हीही शहराच्या तुलनेत कुपवाड शहरास दुय्यम स्थान दिलेले आहे.कुपवाड शहरातील विस्तारीत भागात विविध शैक्षणिक व क्रीडा संकुलनासाठी जागा आरक्षित आहे.असे आरक्षित भुखंड शासनाने ताब्यात घेऊन सदर ठिकाणी आयोजित शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्राची निर्मिती करण्यात यावी, कुपवाड हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे कुपवाड शहरापासून सांगली मिरज तसेच जिल्हा बाहेरील तालुक्यातील गोरगरिब कष्टकरी शेतकरी मजूर कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी उपयोगी व सोईस्कर होणार आहे. कुपवाड शहराच्या जवळपास १ ते २  किलोमीटर अतंरावर असणारे जिल्हा न्यायालय तसेच  जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांचे कार्यालये आहेत येथे जाणे साठी जत,कवठेमहाकाळ,आटपाडी,विटा, तासगाव,पलुस,कडेगाव तालुक्यातील लोकांना  विविध कामासाठी जवळचा मार्ग म्हणून कुपवाड शहरातून जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ या भागात आहे कारण येथेच सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे.(Vanchit Bahujan Aghadi)

तसेच  भौगोलिकदृष्ट्या पाहता राष्ट्रीय महामार्गा पासून अवघ्या काही अंतरावरती कुपवाड शहर आहे यामुळे पुर्व व उत्तर भागातील तालुक्यातुन  येणारे विद्यार्थ्यांना अंत्यत जवळ होणार आहे व बहुतांशी ग्रामीण भागातील काही तरूण येथील औद्योगिक वसाहती मध्ये काम करून शिक्षण घेत आहेत त्यांना ही सोईचे होईल..विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे व अॕफीडेव्हिट साठी सतत जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते तसेच शासकीय सर्व कार्यालये व न्यायालय ,पोलिस मुख्यालय हे कुपवाड शहर नजिकच असुन मध्यवर्ती ठिकाण बनले आहे तसेच पदवी नंतरचे शिक्षणाची सोय असलेले सर्व  महाविद्यालये महापालिका हद्दीत आहेत,शासकीय व खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये,शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये,व्यवस्थापकीय महाविद्यालये,पदवी महाविद्यालये,कायदा महाविद्यालय,परिचारिका विद्यालय असे अनेक शैक्षणिक संकुल या शहरा नजीक आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे तसेच विद्यार्थीनी साठी सर्व सोयीनियुक्त शासकीय वसतिगृहाची उपलब्धता याच शहरात आहे व दळणवळणाचे सर्व साधन येथे मोठे प्रमाणात उपलब्ध आहे,मुलींसाठी सुरक्षित शिक्षण आत्मसात करता येईल प्रवासाचा ताण वाढणार नाही.

   ग्रामीण भागातील पालकांना जिल्हाचे ठिकाणी आपले मुले/मुली शिक्षण घेत असल्याने कधीही भेटता येणे शक्य होईल  तसेच जिल्ह्यातील पंचाहत्तर टक्के महाविद्यालये येथेच उपलब्ध आहेत तसेच महापुरामुळे होण्याऱ्यां नैसर्गिक अपत्ती पासून सुरक्षित ठिकाणी शहर वसलेले आहे. म्हणून कुपवाड शहराच्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे नियोजित उपकेंद्र उभारण्यात यावे.असे आम्ही अशी तीव्र मागणी वंचित बहुजन आघाडी सांगली च्या वतीने करीत आहोत. शिवाजी विद्यापीठाचे विचार करता हे केंद्र कोल्हापूर शहर व राष्ट्रीय महामार्ग नजिक सर्वसोईनियुक्त वसलेले आहे यामुळे कोल्हापुर जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथे पोहचणे सहज शक्य आहे याच धर्तीवर उपकेंद्राचे सुध्दा विचार करण्यात यावे.   


  तरी तात्काळ या मागणी वरती कार्यवाही होवून प्रस्तावित उपकेंद्र कुपवाड शहरातच झाले पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभा करावा लागेल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उमर फारूक ककमरी, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, संजय गुदगे, प्रशांत वाघमारे, बाबासाहेब कांबळे, संजय कांबळे, कृष्णा भारतीय, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.(Vanchit Bahujan Aghadi)