काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा सरळसेवा भरतीचे कंत्राट कंत्राट रद्द करा, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह सक्षम व विश्वासार्ह यंत्रणा नेमण्याची मागणी - वंचित बहुजन आघाडी

महाआयटी कडून सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या मेसर्स ॲपटेक लिमिटेड या काळ्या यादीतील कंपनीमार्फत परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर पोलीस शिपाई भरतीसाठी पुन्हा याच कंपनीची निवड करण्यात आल्याने सरळसेवा भरतीचा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा सरळसेवा भरतीचे कंत्राट कंत्राट रद्द करा, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह सक्षम व विश्वासार्ह यंत्रणा नेमण्याची मागणी - वंचित बहुजन आघाडी
Vanchit Bahujan Aghadi News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

महाआयटी कडून सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या मेसर्स ॲपटेक लिमिटेड या काळ्या यादीतील कंपनीमार्फत परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर पोलीस शिपाई भरतीसाठी पुन्हा याच कंपनीची निवड करण्यात आल्याने सरळसेवा भरतीचा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सरकारच्या दुपट्टी धोरणाबद्दल सर्वसामान्यांन विद्यार्थी यांना चिंता वाटत आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई (महाआयटी) यांनी चार खाजगी कंपन्यांची निवड केली असून महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षातील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमपीएससीच्या कार्यकक्ष बाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.(Vanchit Bahujan Aghadi News)

मात्र या कंपन्यांची निवड करताना महाआयटी मधील तांत्रिक उणिवा मुळे काळ्या यादीतील कंपन्यांची निवड झाल्याचे दिसून येते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मधील विविध पदाची परीक्षा मेसर्स ॲपटेक लिमिटेड कंपनी कडून घेण्यात आली मात्र ॲपटेक कंपनीला आधीच अलाहाबाद आणि दिल्ली उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकले असतानाही महाआयटी ने या बोगस कंपनीची निवड केली पोलीस शिपाई भरती चे काम याच कंपनीला देण्यात आले त्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे १८ ऑक्टोंबर पासून रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत भरती होणार आहे यासाठी ॲपटेक लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली टक्क्याच्या मोहापायी देण्यात आलेल्या काळ्या यादीतील कंत्राट रद्द करून सक्षम व विश्वासार्ह यंत्रणा किंवा एमपीएससीमार्फत घेण्याची प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सिद्धांत पुणेकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे बल्लारपूर तालुका अध्यक्ष प्रथम दुपारे यांनी केली.(Vanchit Bahujan Aghadi News)