करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट

मुंबई सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली.

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट
Vanchit Bahujan Aghadi News

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट

मुंबई  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मुंबई  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. यावेळी करुणा मुंडे यांनी त्यांच्यावरील कौटुंबिक अन्यायाची सविस्तर माहिती दिली. महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार व अन्याय या बाबतीत इथली व्यवस्था गंभीर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "करुणा मुंडे यांच्या बाबतीत दबावाचं राजकारण केले जात असल्याचे दिसत असून आवश्यकता पडल्यास वंचित बहुजन आघाडी करूणा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील" असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य रोहिणीताई टेकाळे आदी उपस्थित होते.(Vanchit Bahujan Aghadi News)