शिवाजी महाराजांच्या तलवारीला बाबासाहेबांच्या लेखणीची जोड-ॲड.संजय रोडे

राज्याभिषेक केल्याशिवाय राजा होता येत नसल्या कारणामुळे व हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतीनुसार शिवाजी महाराज शुद्र वर्णातील असल्याने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांनी तीव्र विरोध केला होता

शिवाजी महाराजांच्या तलवारीला बाबासाहेबांच्या लेखणीची जोड-ॲड.संजय रोडे
Vanchit Bahujan Aghadi News

शिवाजी महाराजांच्या तलवारीला बाबासाहेबांच्या लेखणीची जोड-ॲड.संजय रोडे

राज्याभिषेक केल्याशिवाय राजा होता येत नसल्या कारणामुळे व हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतीनुसार  शिवाजी महाराज शुद्र वर्णातील असल्याने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांनी तीव्र विरोध केला होता

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

  राज्याभिषेक केल्याशिवाय राजा होता येत नसल्या कारणामुळे व हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतीनुसार  शिवाजी महाराज शुद्र वर्णातील असल्याने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांनी तीव्र विरोध केला होता या महाराजांच्या अपमानाचा  बदला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून घेतला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव ॲड.संजय रोडे यांनी केले.ते नाथ्रा ता.परळी येथे दि.20  फेब्रुवारी रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाई यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.(Vanchit Bahujan Aghadi News)


    यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर, जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे, युवा नेते राजेश सरवदे, तालुका नेते विष्णुपंत मुंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजू भुतके हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांनी केले.


    या जयंती कार्यक्रमात लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे व  गायक सुरेश रंजवे, निलेश मुंडे, दीपक मोटे यांचा प्रबोधनात्मक भीम गीतांचा व शिव गीतांचा कार्यक्रम अगदी ऊत्साहात  संपन्न झाला.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटी अध्यक्षा उर्मिला किरवले, उपाध्यक्ष इंदुबाई किरवले, सचिव सुनंदा किरवले, कार्याध्यक्ष कविता पैठणे, सल्लागार शिवशला मुंडे, सदस्य पंकजा किरवले, शांता आदमाने, रमाबाई किरवले, अनिता बनसोडे, मंगलाबाई धाटे, रमाबाई बनसोडे, विमलताई शिंदे व समस्त गावकरी मंडळ आदींनी खूप मोलाचे सहकारी केले व कार्यक्रम यशस्वी केला.(Vanchit Bahujan Aghadi News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/