ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे.....

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. मात्र आज पहाटे ४.४५ वाजता सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली. या दु:खद घटनेने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
फलटण तालुक्यात सोनी मराठीवर सुरु असलेल्या ‘माझी आई काळूबाई’ मालिकेच शुटिंग सुरू आहे. या मालिकेच्या शुटिंग दरम्यान आशालता वाबगावकर यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. यावेळी सेटवर कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे.. त्यानंतर साऱ्यांची तपासणी करण्यात आली असता सेट वरील 27 जण बाधित आढळले आहेत त्यामध्ये आशालता वाबगावकर यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आढळला होता.
त्यांना जाण्याचे सर्वच स्तरावरून दुःख व्यक्त केले जात आहे.
सातारा
प्रतिनिधी - उमेश चव्हाण
_______
Also see : शेतकऱ्यांना कर्ज द्या अन्यथा सोसायटी बरखास्त करा- ज्ञानेश्वर डोणगावकर...