व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हे आज चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहे. सध्या तो कतरिना कैफसोबत अफेअर आणि एंगेजमेंटच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे.

व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल
Vicky Kaushal Movie

व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हे आज चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहे. सध्या तो कतरिना कैफसोबत अफेअर आणि एंगेजमेंटच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हे आज चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहे. सध्या तो कतरिना कैफसोबत अफेअर आणि एंगेजमेंटच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. विकी कौशलच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे तर ‘मसान’  या चित्रपटाने त्याचे नशीब बदलले. याच चित्रपटाने विकीला बॉलिवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्याची ओळख मिळवून दिली. याआधी त्याने 3-4 चित्रपटांमध्ये फक्त किरकोळ भूमिका केल्या होत्या. मुख्य अभिनेता म्हणून विकीचा हा पहिला चित्रपट होता.(Vicky Kaushal Movie)

विकीसाठी मसान हा चित्रपट सोपा नव्हता कारण विकीने केलेला अभिनय आणि त्यामागची मेहनत तोच करू शकतो.या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विकी अनेक दिवस स्मशानात बसत असे. तो प्रत्येक मृतदेह डोळ्यांसमोर जळताना पाहत असे. एवढेच नाही तर विकी कौशलच्या पात्राशी संबंधित बहुतेक दृश्ये स्मशानभूमीत चित्रीत केली गेली. चला तर, ‘मसान’ चित्रपटाचा हा किस्सा जाणून घेऊ.मसान’ हा तरुण दिग्दर्शक नीरज घायवानचा पहिला चित्रपट होता. मसानचे शूटिंग सुरू होण्याआधी विकी कौशल दररोज मणिकर्णिका घाटावर तासनतास बसायचा.

या काळात त्याने अनेक मृतदेह राखेत बदलताना पाहिले होते. काळा, गोरा, सुंदर, कुरूप, श्रीमंत, गरीब, लठ्ठ, हाडकुळा. विकीला बऱ्याचदा वाटले की, या घाटावर लोक निघून जातात आणि फक्त त्यांचे काम फक्त मागे राहते.मसान’ चित्रपटात विकीचे वडील बनलेले विनीतचे पात्रही खूप कठीण होते. तो चित्रपटात डोमराजाची भूमिका साकारत होता. डोम म्हणजे मृत लोकांना जाळणारे लोक. या चित्रपटासाठी विनीतने एका आठवड्यासाठी मणिकर्णिका घाटावर मृतदेहांना अग्नी देण्याचे काम केले होते. या चित्रपटात चांगले काम करता यावे, म्हणून तो दररोज 10 तास घाटावर काम करत असे.

‘मसान’ चित्रपटाचे चित्रीकरण बनारसमधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये करण्यात आले आहे. या दरम्यान, चित्रपटातील कलाकार अग्नी दिल्या जाणाऱ्या मृतदेहांमध्ये वावरत असत. चिता जाळण्यापासून ते मृतदेह पलटवण्यावण्यापर्यंतची दृश्येही प्रत्यक्षात चित्रित केली गेली. अशा प्रकारचे काम कोणत्याही अभिनेत्यासाठी खूप कठीण असते. परंतु, कलाकारांनी चित्रपट जिवंत वाटावा म्हणून पूर्ण समर्पणाने आपली भूमिका बजावली.विकी कौशल सोबत पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, रिचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. 2015 मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने दोन पुरस्कारही जिंकले. यासह, समीक्षकांनी देखील चित्रपटाची कथा आणि सादरीकरणाचे कौतुक केले.(Vicky Kaushal Movie)

दिग्दर्शक नीरज घायवान यांनाही त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून बरीच ओळख मिळाली.