वाडा तालुक्यातील वरले येथील में विधाता स्टील कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांना गंभीर.दुखापत

गवंडी बांधकाम मजुर व जनरल कामगार संघटना यांनी कामगार उपायुक्त- बोईसर यांना पत्र देऊन कंपनी मध्ये स्फोट झालेल्या कामगारांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी. पत्राद्वारे करण्यात आली आहे.

वाडा तालुक्यातील वरले येथील में विधाता स्टील कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांना गंभीर.दुखापत
Vidhata Steel Company

वाडा तालुक्यातील वरले येथील में विधाता स्टील कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांना गंभीर.दुखापत

गवंडी बांधकाम मजुर  व जनरल कामगार संघटना यांनी कामगार उपायुक्त- बोईसर यांना पत्र देऊन कंपनी मध्ये स्फोट झालेल्या कामगारांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी. पत्राद्वारे करण्यात आली आहे.

वाडा सत्यवान तरे:

गवंडी बांधकाम मजुर  व जनरल कामगार संघटना यांनी कामगार उपायुक्त- बोईसर यांना पत्र देऊन कंपनी मध्ये स्फोट झालेल्या कामगारांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी. पत्राद्वारे करण्यात आली आहे.वाड़ा शहरापासून केवळ 4 ते 5 कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे-वरले येथील विधाता स्टील प्रा.लि. या कंपनीत अनेक कामगार काम करीत आहेत. दि. 12/01/2022  रोजी अंदाजे सकाळच्या सुमारास कंपनीत स्फोट होवून 5 कामगार स्फोटात भाजले असल्याचे  समोर आले होते. त्यामध्ये 3 कामगारांना गंभीर भाजले असून  ते  अत्यवस्थ अवस्थेत त्यांना वाड्यातील खाजगी रुग्णालयात बर्न केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.(Vidhata Steel Company)

यापूर्वी देखील स्थानिकांनी कंपनीविरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या मात्र कंपनीची अरेरावी सुरूच आहे.
सदर स्फोटामध्ये जखमी झालेल्या कामगारांना व त्यांच्या  कुटुंबियांना कंपनीने अद्याप पर्यंत कुठलीही आर्थिक मदत दिलेली नसून फक्त रुग्णालयात दाखल केल्याचे समजते यामध्ये गंभीर भाजलेले 3 कामगारांना तातडीने पुढील उपचार मिळावे तसेच या प्रकरणी  कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी  सदर जखमी कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी विनंती गवंडी बांधकाम मजुर  व जनरल कामगार संघटना यांनी कामगार उपायुक्त- बोईसर यांना  पत्र देऊन मागणी केली आहे.या प्रकरणी  सदर घटनेची नोंद वाडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास वाडा पोलीस करत असल्याचे समजते.(Vidhata Steel Company)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/