मनिषा सिध्दार्थ मेश्राम यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्य रत्न पुरस्कार- २०२२ ने सन्मानित

वेदनेतुन संवेदना आणि संवेदनाद्वारे शिक्षण यांचे विवेचन करणारे मासिक शिक्षण संवेदन या मासिकाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती दिनी आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे अनुराग प्रकाशनद्वारे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मनिषा सिध्दार्थ मेश्राम यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्य रत्न पुरस्कार- २०२२ ने सन्मानित
Vidrohi Sahitya Ratna Award

मनिषा सिध्दार्थ मेश्राम यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्य रत्न पुरस्कार- २०२२ ने सन्मानित

वेदनेतुन संवेदना आणि संवेदनाद्वारे शिक्षण यांचे विवेचन करणारे मासिक शिक्षण संवेदन   या मासिकाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती दिनी आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे अनुराग प्रकाशनद्वारे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:  

वेदनेतुन संवेदना आणि संवेदनाद्वारे शिक्षण यांचे विवेचन करणारे मासिक शिक्षण संवेदन   या मासिकाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती दिनी आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे अनुराग प्रकाशनद्वारे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात कवियत्री मनिषा सिध्दार्थ मेश्राम याना राज्यस्तरीय विद्रोही साहित्य रत्न पुरस्कार -२०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.(Vidrohi Sahitya Ratna Award)

राज्यभरातील राज्यस्तरीय पुरस्कारात महात्मा फुले,  सावित्रीबाई फुले,   डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनुराग समाजरत्न आणि विद्रोही साहित्य रत्न असे ४१ पुरस्कार पुरस्कर्त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन, भारतीय संविधानाचे पुजन करून व शिव जय घोषाने मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली. जय मल्हार नगर, बापगाव येथे राहणाऱ्या  कवियत्री मनिषा सिध्दार्थ मेश्राम या भिमाई मातेच्या मुरबाड तालुक्यातील असुन वैचारिक वारसा लाभलेल्या शिव, फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो. अनेक सामाजिक व धाम्मिक कार्यक्रमातून त्या आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असतात.

विविध कवी संमेलनात त्यांचा सहभाग असून विविध विषयावर प्रबोधनात्मक कविता त्या सादर करीत असतात. एवढंच नव्हे तर, एक उत्तम कवियत्री म्हणून देखील त्यांची ओळख आज अनेकांच्या नजरेतून पाहायला मिळ्ते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कवियत्री मनिषा सिध्दार्थ मेश्राम याना राज्यस्तरीय विद्रोही साहित्य रत्न पुरस्कार -२०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातून साहित्य क्षेत्र, सामाजिक  क्षेत्र  व धाम्मिक  क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज्यभरातील लेखक व कवी यांच्या निवडक १० पुस्तकांचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात प्रा. डॉ. सुभाष खंदारे माजी सीईओ विजय सिंह नाईक प्रा.डॉ. रतणी ठाकूर  एड दिलीप वाळंज प्रा. डॉ. अपर्णा प्रभू प्रा. डॉ. दीपक वाघ  डॉ. केळशार जाधव प्रा. वामन निकम आदी उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिक्षण संवेदन संस्थापक- संपादक  प्रा. डॉ. माधव गवई, प्रा. डॉ. कमल माधव गवई प्रकाशिका अनुराग प्रकाशन यांनी केले.(Vidrohi Sahitya Ratna Award)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/