विक्रमगड जव्हार रोड वरील जांभे येथील वळणदार रस्ता संरक्षण भिंतीच्या बांधकामा साठी संभाजी ब्रिगेड आग्रही

विक्रमगड जव्हार रोड दरम्यान जांभे  व साखरेच्या दरम्यान वळणदार रस्त्यावर वर्षानुवर्षे अपघात होऊन कित्येक वेळा मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

विक्रमगड जव्हार रोड वरील जांभे येथील वळणदार रस्ता संरक्षण भिंतीच्या बांधकामा साठी  संभाजी ब्रिगेड आग्रही
Vikramgad Jawahar Road

द गनिमी कावा न्युज पोर्टल प्रतिनिधी अजय लहारे:

विक्रमगड जव्हार रोड दरम्यान जांभे  व साखरेच्या दरम्यान वळणदार रस्त्यावर वर्षानुवर्षे अपघात होऊन कित्येक वेळा मृत्यूच्या घटना घडल्या आहेत, कारण या रस्त्यावर जी वळणे आहेत त्या वळणावर संरक्षण भिंतीच नाही आणि सूचना फलक ही नाहीत त्यामुळे अपघात वाढत आहेत. सदर गोष्ट संभाजी ब्रिगेड विक्रमगड च्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले असून तसे पत्रव्यवहार व निवेदन दिले आहेत. असे असून सुद्धा 17-08-2021रोजी च्या निवेदना नंतर 13-10-2021रोजी रात्री त्या ठिकाणी अपघात होऊन कै. प्रदीप चिंतामण गवळी रा. बांधन(खाण्याचापाडा)ता. विक्रमगड या युवकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला व दुसरा तरुण गंभीर दुखापत झालेला आहे. तसेच त्याच्या आदल्या दिवशी ही अपघात त्याच ठिकाणी झालेला आहे.(Vikramgad Jawahar Road)

असे प्रकार वारंवार होत सार्वजनिक बांधकाम खात्याला वारंवार निदर्शनास आणून दिले आहेत, या सर्व गोष्टींना सार्वजनिक  बांधकाम खाते जिम्मेदार असून टाळाटाळ करत आहे.सदर सर्व बाबींस सार्वजनिक खाते कानाडोळा करत असून मृत्याच्या परिवारास नुकसान भरपाई देण्यात यावी व  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यास संभाजी ब्रिगेड ची मागणी जोर धरू लागली आहे.(Vikramgad Jawahar Road)