भव्य धम्म रॅलीने श्रामनेर, विपस्सना परिचय शिबीरास उत्साहात प्रारंभ

धकाधकीच्या जीवनात मनाची मशागत करण्यास कोणासही वेळ नाही, परंतु मनाची व शरिराची काळजी घेणे गरजेचे आहे.

भव्य धम्म रॅलीने श्रामनेर, विपस्सना परिचय शिबीरास उत्साहात प्रारंभ
Vipassana introductory camp

भव्य धम्म रॅलीने श्रामनेर, विपस्सना परिचय शिबीरास उत्साहात प्रारंभ

धकाधकीच्या जीवनात मनाची मशागत करण्यास कोणासही वेळ नाही, परंतु मनाची व शरिराची काळजी घेणे गरजेचे आहे. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि.११ धकाधकीच्या जीवनात मनाची मशागत करण्यास कोणासही वेळ नाही, परंतु मनाची व शरिराची काळजी घेणे गरजेचे आहे. बाल मनावर सुसंस्कार होण्याकरीता श्रामनेर शिबीरार्थींच्या मनावर धम्म संस्कार रुजावे, त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे व त्यांनी आपले जीवन सुमार्गाने जगावे, व्यसनापासून दूर रहावे व सुजान नागरीक बनून माणसाशी माणसासारखे वागून माणूस म्हणून जगावे व धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा या करीता पू.भिक्खु धम्मशील यांच्या नवव्या वर्षावास समापनाच्या निमित्ताने बलभिमनगर, पेठ बीड येथे भव्य असे श्रामनेर शिबीर तथा विपस्सना परिचय शिबीराचे डॉ. भदन्त इंदवंस्स महाथेरो (मुंबई) यांच्या धम्म देशनेने उत्साहात प्रारंभ झाला.(Vipassana introductory camp)


शिबीराच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्रिसरण-पंचशील नंतर तथागत बुध्द विहारापर्यंत भव्य अशी धम्म रॅली काढण्यात आली. पंचशीलाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने वातावरण धम्ममय झाले. शिबीर उद्घाटन देशने प्रसंगी उपा. अमरसिंह ढाका, राजु जोगदंड, शितलकुमार सुकाळे सर यांची व परिसरातील बहुसंख्य उपासक, उपासिक व बालकांची उपस्थिती होती. या शिबीरात भिक्खु धम्मशील व भिक्खु धम्मरक्षितथेरो नागपूर यांचे पंधरा दिवस मार्गदर्शन लाभणार आहे. भिक्खु धम्मशील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड व तथागत बुध्दविहार बलभिमनगर, संयोजन समिती आणि सम्राट अशोक बुध्द विहार पेठ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. बुध्द विहार बलभिमनगर परिसरातील व सम्राट अशोक बुध्द विहार परिसरातील उपासक, उपासिका व प्रियदर्शी ध.शि.संस्थेचे सभासद यशस्वीकरीता प्रयत्नशील आहेत. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास आलेल्या सर्व बौध्द उपासक, उपासिकानी तथागत बुध्द विहार समितीच्यावतीने भोजनदान देण्यात आले.(Vipassana introductory camp)