विरारमध्ये ICICI बँकेत सशस्त्र दरोड्याचा थरार

विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरार मध्ये सशस्त्र हल्ला करीत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे.

विरारमध्ये ICICI बँकेत सशस्त्र दरोड्याचा थरार
Virar ICICI bank Robbery

विरारमध्ये ICICI बँकेत सशस्त्र दरोड्याचा थरार

विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरार मध्ये सशस्त्र हल्ला करीत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे.

विरारमध्ये आज रात्री 8 च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. विरार मध्ये सशस्त्र हल्ला करीत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. विरार पूर्व स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय बँकेत आज रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडल्यानं खळबळ उडाली असल्याचं समोर आलं आहे.(Virar ICICI bank Robbery)

 दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकला. सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जो दरोडेखोर पकडलेला आहे तो दरोडेखोर याच बँकेत पूर्वी मॅनेजर असल्याचीही माहिती आहे.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. योगिता वर्तक-चौधरी असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रद्धा देवरुखकर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र एका महिलेचा मृत्यू झाला. श्रद्धा देवरुखकर या महिलेवर उपचार करण्यात येत आहेत.

विरार पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन, दोन्ही जखमी महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले होतं. विरार पोलिसांकडून घटनास्थळावर माहिती घेतली. दोन महिला कर्मचारीवर प्राणघातक हल्ला.दोन दरोडेखोरांनी आयसीआयसीआय बँकेच्या विरार येथील शाखेवर दरोडा टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असाताना एका दरोडेखोराला नागरिकांनी शिताफीनं पकडलं.

एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दरोडेखोरोची चौकशी केल्यानंतर या घटनेमागील नेमंक कारण समोर येणार आहे. पोलिसांकडून या प्रकारणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.विरार पोलिसांनी या घटनेप्रकरणी घटनास्थळावरून एका दरोडेखोराला अटक केली आहे. नागरिकांनी मोठं धाडस दाखवत दरोडेखोर व्यक्तीला पकडून ठेवलं होतं. दरोडेखोर व्यक्ती हा बँकेचा पूर्वीचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.(Virar ICICI bank Robbery)

  या घटनेमागील कारणाचा शोध घेण्यासाठी विरार पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.