सोयाबीन क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार

सोयाबीनला प्रति क्विंटल 9700 दर मिळत आहे. संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.

सोयाबीन क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार
WASHIM APMCP PRICE

सोयाबीन क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार

सोयाबीनला प्रति क्विंटल 9700 दर मिळत आहे. संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.

जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला झळाळी मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार सातशे दर मिळत आहे.शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते.(WASHIM APMCP PRICE)

शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो.अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात ऐन हंगामात सोयाबीनला 2600 ते 3600 या दरम्यान प्रती क्विंटल दर असतात. 

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्याच्या अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो.सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर 7 ते 8 महिन्याने बाजारभाव वाढतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्याना येतो.सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. 

त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे.वाशिम जिल्ह्यात खरिपात एकूण क्षेत्रापैकी 80 टक्के सोयाबीन ची शेती केली जाते.सोयाबीन ला पाहिजे तसा दर मिळत नव्हता यंदा मात्र सोयाबीन ला उच्चांकी दर मिळत असून, नऊ हजार 700 रुपये दर मिळत आहे.पश्चिम विदर्भातील सोयाबीन ची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसापासून चांगले दर मिळत आहेत.

शासकीय आधारभूत किंमत 3 हजार 880 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र दर नऊ हजार पार गेले आहेत.हेच दर कायम राहिल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील.जिल्ह्यात सोयाबीनचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. त्यावेळी सोयाबीन ला 3 हजार 500 ते 4 हजार पर्यंत दर होता.आता सोयाबीन ला इतिहासात पहिल्यादांचं 9 हजार पार दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.(WASHIM APMCP PRICE)

हे दर 2021 चा हंगामात ही कायम राहावे अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.