वाकडपाडा गावदेवी चषक स्पर्धेचा सामनावीर ठरला पिंपळपाडा संघ

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा गावदेवी चषक ओव्हर आर्म क्रिकेटस्पर्धेचा सामनावीर पिंपळपाडा संघ ठरला असल्याची माहिती दि १० जानेवारी वार सोमवार रोजी मिळाली आहे.

वाकडपाडा गावदेवी चषक स्पर्धेचा सामनावीर ठरला पिंपळपाडा संघ
Wakadpada Gavdevi Cup

वाकडपाडा गावदेवी चषक स्पर्धेचा सामनावीर ठरला पिंपळपाडा संघ

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा गावदेवी चषक ओव्हर आर्म क्रिकेटस्पर्धेचा सामनावीर पिंपळपाडा संघ ठरला असल्याची माहिती दि १० जानेवारी वार सोमवार रोजी मिळाली आहे.

माधुरी आहेर मोखाडा:

मोखाडा  -मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा गावदेवी चषक ओव्हर आर्म क्रिकेटस्पर्धेचा सामनावीर पिंपळपाडा संघ ठरला असल्याची माहिती दि १० जानेवारी वार सोमवार रोजी मिळाली आहे.गावदेवी चषक वाकडपाडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला असुन प्रदिप वाघ व आदिवासी विकास हक्क संघर्ष समितिच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या. बेरीस्ता व धामोडी यात सेमी फायनल होऊन.धामोडी संघ विजयी झाला.तेलीपाडा व पिंपळपाडा यात सेमी फायनल होऊन पिंपळपाडा संघ विजयी झाला.(Wakadpada Gavdevi Cup)

पिंळपाडा व धामोडी या संघात फायनल होऊन पिंपळपाडा संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला आहे व सामनावीर ठरले आहे.धामोडी या संघाने द्वितीय,बेरीस्ते संघाने त्रितीय क्रमांक तर तेलीपाडा संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट बॅट्समनचे बक्षीस पिंपळपाडा संघातील सलमान याला देण्यात आले, तर उत्कृष्ट बॉलरचे बक्षीस धामोडी संघातील कमळाकर याला देण्यात आले तर मॅन ऑफ द मॅचचे बक्षीस पिंपळपाडा संघातील सलमानला देण्यात आले.शिस्तप्रिय खेळाडूचे बक्षीस अशोक वाघला देण्यात आले.  दरम्यान खिलाडूवृत्ती चे दर्शन करत सर्व स्पर्धकांनी जय पराजय आनंदाने स्विकारत स्पर्धेत सहभाग नोंदवला.


बक्षीस वितरण समारंभाला सुभाष हमरे,हनीफ शेख,दिनकर मुकणे,सरपंच संजय वाघ, पोलीस पाटील विठ्ठल गोडे, हरीभाऊ खोरगडे,शिक्षक नितिन आहेर,शिक्षक संतोष पाटील, सोमनाथ हमरे,मोकाशी, देविदास गवारी,हनुमंत पादिर,इमरान शेख,आत्माराम हमरे,सुरेश पाडेकर, विलास कडू ,योगेश खोरगडे,युवराज वाघ, दत्ता शिंदे, देवराम कडू उपस्थित होते.स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी  नंदकुमार वाघ,अशोक वाघ,नरेंद्र वाघ, गणेश खादे, अंकुश वाघ,रवींद्र बेडकोळी,विलास गवारी,अनिकेत कोथे,मंगेश गवारी, योगेश वाघ, मोहन गवारी,शाम फसाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.(Wakadpada Gavdevi Cup)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/