वॉर्ड क्र 24 मध्ये जाणूनबुजून मागासवर्गीय वस्तीची कामेन केल्यामुळे लवकरच आंदोलन करणार

बीड शहरातील धानोरा रोड भागातील वॉर्ड क्र 24 या भागात 60% मागासवर्गीय समाज राहतो या भागातील लोकांच्या घरासमोर अजूनही नाल्या व रस्ते नाहीत.

वॉर्ड क्र 24 मध्ये जाणूनबुजून मागासवर्गीय वस्तीची कामेन केल्यामुळे लवकरच आंदोलन करणार
Ward No 24 in Dhanora Road area

वॉर्ड क्र 24 मध्ये जाणूनबुजून मागासवर्गीय वस्तीची कामेन केल्यामुळे लवकरच आंदोलन करणार

बीड शहरातील धानोरा रोड भागातील  वॉर्ड क्र 24 या भागात 60% मागासवर्गीय समाज राहतो या भागातील लोकांच्या घरासमोर अजूनही नाल्या व रस्ते नाहीत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  दि.12- बीड शहरातील धानोरा रोड भागातील  वॉर्ड क्र 24 या भागात 60% मागासवर्गीय समाज राहतो या भागातील लोकांच्या घरासमोर अजूनही नाल्या व रस्ते नाहीत व पाऊस चांगला पडल्यामुळे सर्व तळे 100% भरूनही पंधरा दिवसाला पाणी सोडून नागरिकांची गोची करण्याचे काम नगरपालिका करत आहे.(Ward No 24 in Dhanora Road area)

मुख्य धानोरा रोड हा अंदाजे 40 ते 50 गल्लीत जाणारा रस्ता असून या रस्त्यावर 24 तास वाहतूक चालू असते या रोड वर गुडघ्या एवढे खड्डे पडलेले आहेत दर दोन तीन दिवसाला अनेकदा महिला अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.कामाचे उदघाटन होऊन खूप दिवस झालेले आहे अध्यापपर्यंत कामाला सुरुवात झाली नसून,तसेच मुख्य धानोरा रोड चे रुंदीकरण करून हा 100 फुटी सिमेंट रस्ता करण्यात यावा या मागण्या पूर्ण कराव्या व झोपलेल्या नगरपालिका ला जागे करण्यासाठीलवकरच वंचित बहुजन आघाडी बीड च्या वतीने मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,बबन वडमारे,अजय(भैय्या) सरवदे,,अनंत सरवदे,संतोष जोगदंड, लखन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्र 24 चे अनिल उर्फ राजू कोठेकर यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.(Ward No 24 in Dhanora Road area)