तळपत्या उन्हात वॉटर ATM बंद

दुष्काळात तेरावा महिना काय असतो, या परिस्थितीचा अनुभव सध्या चंद्रपुरात येत आहे. चंद्रपूरच्या मुख्य शासकीय कोविड रुग्णालयात असुविधांचा डोंगर बघायला मिळत आहे.

तळपत्या उन्हात वॉटर ATM बंद
Water ATM

तळपत्या उन्हात वॉटर ATM बंद

Water ATM closed 

दुष्काळात तेरावा महिना काय असतो, या परिस्थितीचा अनुभव सध्या चंद्रपुरात येत आहे. चंद्रपूरच्या मुख्य शासकीय कोविड रुग्णालयात  असुविधांचा डोंगर बघायला मिळत आहे.

दुष्काळात तेरावा महिना काय असतो, या परिस्थितीचा अनुभव सध्या चंद्रपुरात येत आहे. चंद्रपूरच्या मुख्य शासकीय कोविड रुग्णालयात असुविधांचा डोंगर बघायला मिळत आहे. चंद्रपूरच्या एप्रिल महिन्यातील तळतळत्या उन्हात इथले वॉटर ATM बंद झाले आहे. पाण्याच्या घोटासाठी रुग्ण- नातेवाईक यांना तासातासाला पदरचे पैसे खर्च करावे लागत आहेत.

गडचिरोली, नागपूर, तेलंगणा, यवतमाळ येथून स्वतःच्या वाहनाने उपचाराच्या आशेने जिल्हा मुख्यालयी आलेले रुग्ण आणि नातेवाईक जागा मिळेल तिथे पथारी पसरून आल्या बिकट प्रसंगाचा सामना करत आहेत. त्यांच्या जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. बेडच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण रुग्णवाहिका-बेड-औषधे-इंजेक्शन- विसावा आणि पाणी या असुविधांनी त्रासले आहेत. डझनावारी रुग्ण स्वतःच्या वाहनात कोविड रुग्णालयाबाहेर बेडसाठी प्रतीक्षा करत आहेत.

हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले
बेड न मिळाल्यामुळे एका तरुणाने नाशिकमधील रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडली आहे. पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीने अखेरचा श्वास घेतल्याने उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. 

अरुण माळी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरुणला त्रास होऊ लागल्यानंतर पत्नी सुरेखा त्याला घेऊन रुग्णालयात आली होती. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन चेक केले.

अरुणच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे  सांगितले.