मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसह झडपा बसवणे, फ्लो मीटर बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
Water Cut in Mumbai

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसह झडपा बसवणे, फ्लो मीटर बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने मुंबईत 3 ऑगस्ट रोजी पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईच्या काही भागात वितरीत करणाऱ्या पाईपलाइनच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 8.30 ते रात्री 10.30 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. त्यादृष्टीने पालिकेने नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवण्याचे आवाहन केले आहे.मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसह झडपा बसवणे, फ्लो मीटर बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.यामध्ये एफ उत्तर शीव-माटुंगा आणि एफ दक्षिण प्रभाग, लालबाग-परळ वगळता सर्व विभागांत 15 टक्के पाणीकपात होणार आहे.(Water Cut in Mumbai)

अंधेरी पश्चिम-स्वामी विवेकानंद रोड, गुलशन नगर, आर.एम. मार्ग गिल्बर्ट हिल, जुहू कोळीवाडा, क्रांतीनगर, विलासनगर, शक्तीनगर, कदमनगर, आनंदनगर, पाटलीपुत्र, चार बंगला, वीरा देसाई रोड, मोरगाव, यादवनगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्टेशन मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली टेकडी या भागात पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. याशिवाय अंधेरी पूर्व-बांद्रेकरवाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे प्लॉट, हरीनगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत भागातह पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

यामध्ये जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर, विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्राrनगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्ल्याच्या बहुतांश भागातही पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

गोरेगाव ,बिंबिसार नगर, राममंदिर, गोरेगाव पश्चिम येथील पाणीपुरवठा खंडित राहील. कुर्ला-विभाग क्रमांक 157 संघर्ष नगर, खैरानी मार्ग आणि परिसर, विभाग क्रमांक 158 यादव नगर, वृंदावन वसाहत, अंजली मेडिकल परिसर, विभाग क्रमांक 159, दुर्गामाता मंदिर रोड, लोयलका कंपाऊंड, भानुशाली वाडी, चर्च गल्ली व परिसर, घाटकोपर, आनंद नगर उदंचन केंद्र व वर्षानगर उदंचन केंद्रावरून पुरवठा होणारा परिसर, भटवाडी, बर्वे नगर, भीमनगर, गोळीबार मार्ग, जगदुषा नगर, रामजीव नगर, सिद्धार्थ नगर, गावदेवी, अमृत नगर, आझाद नगर, पारशीवाडी, काजू टेकडी, गंगावाडी, घाटकोपर.(Water Cut in Mumbai)

या ठिकाणच्याही पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.