माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं.

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
West Bengal Assembly Election

 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

Congratulations to Mamata Banerjee from the son of the former Chief Minister

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं.

अभिनेता रितेश देशमुख  याने ममता बॅनर्जी  यांचे तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर ममतादीदींनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

रितेश हा महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा धाकटा सुपुत्र. विलासरावांनी मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी  सांभाळली आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची  धुरा होती. त्यामुळे रितेशने आपल्या वडिलांच्या सहकारी असलेल्या बॅनर्जींनाच शुभेच्छा दिल्या आहेत.

तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल ममताजी  यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांचा विजय
विलक्षण होता. तृणमूल काँग्रेसच्या बाजूने प्रचंड जनादेश होता, अशा आशयाचे ट्वीट रितेशने केले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे की, काँग्रेस आणि डाव्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 44 तर माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 26 जागांवर विजय मिळाला होता. 2011 मध्ये डाव्यांची सत्ता गेली तेव्हा काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.

2011 मधील निवडणुकीत डाव्यांना 40 जागा मिळाल्या होत्या. 1977 पासून 2006 पर्यंत डाव्यांची सत्ता होती तेव्हा काँग्रेस कधीही शून्यावर पोहोचली नव्हती.

काँग्रेसला 2006 मध्ये 21, 2001 मध्ये 26, 1996 मध्ये 82, 1991 मध्ये 43, 1987 मध्ये 40, 1982 मध्ये 49, तर 1977 मध्ये 20 जागा मिळाल्या होत्या.