दलित पॅथरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार - डाॅ.घनशाम भोसले
दलित पॅथर चे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या खेड तालुक्यातील जन्मभुमी चांदुली गाव येथे दलित पॅथरच्या वतीने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रता आणि महिला मेळावा घेण्यात आला.

कोरोना व्हायरसच्या सकंटामुळे राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे त्यामुळे रोजगांराचा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच खेड तालुक्यातील हजारो महिलांना दलित पॅथरच्या माध्यमातून बेरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे कितीतरी मजुरांना दलित पॅथर मुळे दिलासा मिळणार आहे.
दलित पॅथर चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांच्या पुढाकाराने अर्जुन भाऊ शिंगे यांची पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी तर दिपक आळणे याची खेड तालुकाध्यक्ष पदी आणि काजल कातोरे यांची खेड तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी दलित पॅथर चे केंद्रिय कोषाध्यक्ष श्रीकांत लोणारे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष गायकवाड, पुणे शहर संघटक निलेश बनसोडे, खेड तालुका अध्यक्ष दिपक आळणे तसेच खेड तालुक्यातील भिम सैनिक आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रत्येक गावा-खेड्यात दलित पॅथरच्या शाखा उघडण्यात येतील अशी भूमिका मांडण्यात आली.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_________
Also see : पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या कार्याची गृहमंत्र्यांनी घेतली दखल
https://www.theganimikava.com/Home-Minister-took-note-of-the-work-of-Pimpri-Chinchwad-Commissioner