अमरावती एसटी डेपोतील स्तनपान कक्ष बंद:यशोमती ठाकूर संतापल्या

अमरावती विभागीय बसस्थानकातील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष हा बंद स्थितीत आढळल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या.

अमरावती एसटी डेपोतील स्तनपान कक्ष बंद:यशोमती ठाकूर संतापल्या
Yashomati Thakur News

अमरावती एसटी डेपोतील स्तनपान कक्ष बंद:यशोमती ठाकूर संतापल्या

अमरावती विभागीय बसस्थानकातील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष हा बंद स्थितीत आढळल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या.

अमरावती विभागीय बसस्थानकातील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष हा बंद स्थितीत आढळल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. कोणत्याही बस स्थानकामध्ये असलेला स्तनपान कक्ष हा स्तनदा मातांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे तो अहोरात्र उघडाच असला पाहिजे, असे आदेश मंत्री यशोमती ठाकूर यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.(Yashomati Thakur News)

त्यांनी अमरावती बस डेपो मध्ये जाऊन अचानक पाहणी केली असता ही बाब समोर आली. नवजात बालकांना स्तनपान करता यावे यासाठी राज्यात अनेक बस स्थानकांमध्ये स्तनपान कक्षाची उभारणी महिला बाल विकास विभागामार्फत करण्यात आली आहे. मात्र कित्येकदा या स्तनपान कक्षाची दुरावस्था असते अथवा तो बंद स्थितीत असतो. अशीच परिस्थिती अमरावती बसस्थानकांमध्ये अचानक भेट दिली असता महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांना आढळली.

यावेळी त्यांनी संबंधित एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा स्तनपान कक्ष उघडा ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच स्तनदा मातांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याविषयी बजावले.जागतिक ‘ब्रेस्टफिडींग विक’ हा 1 ऑगस्ट पासून आठवडाभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने तरंग सुपोषित महाराष्ट्राचा उपक्रमाचा वापर होणे क्रमप्राप्त असल्याने पोषण अभियानांतर्गत सुरु आहे. कोरोना महामारीच्या काळात या सेवेत खंड पडू नये आणि बाल संगोपन आणि सुपोषण नियमितपणे तसेच सुयोग्यरित्या व्हावे यासाठी तरंग सुपोषणाचे या मोहिमेमुळे लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.व्हाट्सअ‍ॅप चॅट, प्रत्यक्ष फोन याद्वारे हजारो लाभार्थ्यांनी माहिती घेऊन समुपदेशन आणि इतर बाबी योग्यरीत्या नियोजित केल्या आहेत.

आता तरंग सुपोषणाच्या माध्यमातून 8080809063 हा फोन क्रमांक परवलीचा क्रमांक ठरला आहे.तरंग सुपोषण अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात आय व्ही आर हेल्पलाइन, व्हाट्सअ‍ॅप चॅट बोट, ब्रॉडकास्ट फोन आणि संदेश प्रणाली तसेच एक घास मायेचा आजीबाईच्या गूजगोष्टी या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. महामारी च्या काळातही संभाव्य लाभार्थ्यांशी संवाद सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचा तरंग सुपोशित महाराष्ट्राचा हा एक उत्कृष्ट डिजिटल उपक्रम आहे.

टेली न्यूट्रिशनच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. कारण आपण आपल्या एका बोटाच्या क्लीकवर पोषण आणि मुले, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. वयानुसार पोषण समुपदेशन सीडी आणि प्री स्कूल ईसीसी उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी घरी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे व्यासपीठ अत्यंत प्रभावी म्हणून काम करीत आहे.(Yashomati Thakur News)

अशी प्रतिक्रिया या विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी व्यक्त केली आहे.