यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
Yashomati Thakur News

यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. 

 काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप करत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मदतीसाठी साद घातलीय. त्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. शळद येथील मराठा हॉटेल येथे अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते.मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नव्हते. या कामाला 450 रुपये मिळत होते. आपण आता आम्ही हे वाढवून 1,125 रुपये केले.(Yashomati Thakur News)

यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल.”महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहचायचं याचाच विचार आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे,” असंही यावेळी त्यांनी नमूद केलं.

यावेळी यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावरही सडकून टीका केली. यशोमती ठाकूर म्हणाल्या, “जोपर्यंत देशात परिवर्तन येत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला विभागण्याचे प्रयत्न होत राहतील. घर वापसीच्या नावाखालीही हे होतं आणि मग जय श्रीराम म्हटलं जातं. आपण रामराम, सिताराम म्हणतो. एकीकडे देशात ‘राम तेरी गंगा मैली हो गई’. त्या गंगेत हजारोंनी प्रेतं होती. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार हिंदू विरोधी सरकार आहे.(Yashomati Thakur News)

आपण जागृत झालो नाही तर हे लोक असंच करत राहतील. संविधानाचा अपमान करत राहतील.