जि. प.शाळा गोऱ्हे येथे सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा गोऱ्हे येथे दि. १३ रोजी सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

जि. प.शाळा गोऱ्हे येथे सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा गोऱ्हे येथे दि. १३ रोजी सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
रवींद्र घरत पालघर:
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा गोऱ्हे येथे दि. १३ रोजी सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले असून वाचनालय पुण्यकर्म फाउंडेशन, गोरेगाव (मुंबई )यांच्या सौजन्याने प्राप्त झाले आहे . या उद्घाटन प्रसंगी पुण्यकर्म फाउंडेशनचे विशाल खंदारी तसेच सक्षम फाउंडेशन गोरेगाव येथील सुगम कुलकर्णी उपस्थित होते . त्याचप्रमाणे गो-हे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळकृष्ण तांडेल सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. सदर कार्यक्रमास विद्या मंदिर गो-हेचे मुख्याध्यापक विनोद भोईर , गोऱ्हे शाळेचे माजी मुख्याध्यापक गोपाळ आगीवले, शाळा व्यवस्थापन समिती शाळा गो-हेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष ,ग्रामस्थ , प्रतिष्ठित नागरिक, गो-हे केंद्राचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.(Zilla Parishad Kendrashala Gorhe)
वाचनालयाचे उद्घाटन विशाल खंदारी व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते लाल फीत कापून करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पाटील सर, प्रास्ताविक वसंत भोईर सर यांनी सादर केले. 'मेक बुक युवर बेस्ट फ्रेंड' हा संदेश खंदारी दांपत्याने विद्यार्थ्यांना दिला . सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही या ज्ञानभंडाराचा अधिकाधिक उपयोग करून घेऊ असे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली. आभार प्रदर्शन अनुष्का चौधरी यांनी करत कार्यक्रमाचा समारोप केला. शाळेतील हरेश पाटील, यतीन ठाकरे, भाऊसाहेब बोचरे, साधना भानुशाली, समिधा पाटील या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
पुण्य फाउंडेशन व समक्ष फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद शाला गो-हे या शाळेत अनेक उपक्रम राबवण्यात आले असून विद्यार्थ्यांना १५ स्मार्टफोन समक्ष फाउंडेशन यांच्या मार्फत देण्यात आले आहे. तसेच या शाळेत समक्ष फाउंडेशन मार्फत निबंध स्पर्धाही घेण्यात येणार असल्याचे सुगम कुलकर्णी यांनी सांगितले.(Zilla Parishad Kendrashala Gorhe)