घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

कोविड नियमावलीमुळे शाळा बंद असताना परळी तालुक्यातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास व गृहपाठ घेणारे प्राथमिक शिक्षक शेखर फुटके यांच्या कार्याची बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे.

घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल
Zilla Parishad School

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी (दि. 17) : कोविड नियमावलीमुळे शाळा बंद असताना परळी तालुक्यातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास व गृहपाठ घेणारे प्राथमिक शिक्षक शेखर फुटके यांच्या कार्याची बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे.(Zilla Parishad School)

धनंजय मुंडे यांनी शिक्षक शेखर फुटके यांचे फेसबुक पोस्टद्वारे "आमच्या परळी मतदारसंघातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. शेखर फुटके हे शाळा बंद असल्या तरी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना गृहपाठ देतात व दुसऱ्या दिवशी जाऊन तो गृहपाठ व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आढावा घेतात.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे शिक्षक इतक्या प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम करतात ही निश्चीतच इतरांसाठी प्रेरणादायी बाब आहे. असे शिक्षक नक्कीच आमच्या समाजासाठी आदर्श आहेत. फुटके सर, आम्हाला आपला अभिमान आहे." अशा शब्दात कौतुक केले आहे. 

धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा समाज कल्याण विभागाने लॉकडाऊन काळात भिक्षा मागणारे, बेघर, पालावर राहणारे आदी पालकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात मिशन डायरेक्ट ऍडमिशन ही संकल्पना राबवून सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाचा शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. यांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील समाज कल्याण विभागाचे शिक्षक शाळा बंद असताना जागा मिळेल तिथे शिक्षणाचे धडे गिरवत असताना बीड जिल्ह्याने पाहिले आहे.समाज कल्याण विभागाच्या त्या सर्वच शिक्षकांचे देखील धनंजय मुंडे यांनी यापूर्वी कौतुक केले होते. दरम्यान शेखर फुटके यांच्या सारखे शिक्षक समाजात आदर्श व प्रेरणादायी असून अशा व्यक्तिमत्वाचा अभिमान असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.(Zilla Parishad School)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/