समन्वय समितीच्या मागण्यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी घेतली दखल

मोखाडा तालुका शिक्षकांच्या समन्वय समितीच्या निवेदनाची जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी दखल घेतली असून निवेदनातील प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिनांक 20 ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

समन्वय समितीच्या मागण्यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी घेतली दखल
Zilla Parishad Vice President

माधुरी आहेर मोखाडा प्रतिनिधी:

मोखाडा तालुका शिक्षकांच्या समन्वय समितीच्या निवेदनाची जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी दखल घेतली असून निवेदनातील प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिनांक 20 ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.समन्वय समितीचे अध्यक्ष भरत गारे, सहसचीव भाऊ नावळे,सदस्य हेमंत लहामगे,संतोष पाटील व नितिन आहेर यांनी हे निवेदन दिले आहे.मोखाडा तालुका समन्वय समितीने  जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांच्या दालनात जाऊन हे निवेदन दिले आहे.यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी निवेदनातील प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाध्यक्ष यांच्या दालनात बोलावून त्यांना निवेदनातील प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जे अधिकारी कार्यालयीन कामकाजामुळे दालनात नव्हते त्यांना ज्ञानेश्वर सांबरे व प्रकाश निकम यांनी दूरध्वनीवरून सूचना दिलेल्या आहेत.(Zilla Parishad Vice President)

या निवेदनात खालील मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत.निवड श्रेणी ची प्रकरणे निकाली काढण्याबाबत, चटोपाध्याय प्रश्न निकाली काढण्याबाबत, पदोन्नती - विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,विज्ञान शिक्षक यांचे नियमाप्रमाणे पदोन्नती होणे बाबत, मोखाडा तालुक्यातील केंद्रप्रमुख यांच्या रिक्त पदावर प्रभारी केंद्रप्रमुख नेमण्याबाबत
 प्राथमिक शिक्षकांचा पगार एक तारखेला होण्याबाबत तसेच पूर्वीप्रमाणे तालुकास्तरावर पगार होण्याबाबत 2014 च्या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याबाबत प्रलंबित प्रकरणे- फंडाची प्रकरणे सेवानिवृत्त प्रकरणे,पेन्शन प्रकरणे अनुकंपा योजना,वैद्यकीय बिलांना तरतूद,आंतरजिल्हा बदली प्रकरणे वरील प्रकरणे निकाली काढण्याबाबत(Zilla Parishad Vice President)