आधारवड "जिजाऊ" संस्थेचा वारघडपाड्यातील गरजूला मदतीचा हात

गरीबांची आधारवड म्हणून ओळखल्या जाणा-या माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून मोखाडा तालुक्यातील वारघडपाडा येथील गवते कुटूंबियांना मदत करण्यात आली.

आधारवड  "जिजाऊ" संस्थेचा वारघडपाड्यातील गरजूला मदतीचा हात
Zilla Parishad vice president

आधारवड "जिजाऊ" संस्थेचा वारघडपाड्यातील गरजूला मदतीचा हात

गरीबांची आधारवड म्हणून ओळखल्या जाणा-या माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून मोखाडा तालुक्यातील वारघडपाडा येथील गवते कुटूंबियांना मदत करण्यात आली. 

माधुरी आहेर मोखाडा:

गरीबांची आधारवड म्हणून ओळखल्या जाणा-या माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून मोखाडा तालुक्यातील वारघडपाडा येथील गवते कुटूंबियांना मदत करण्यात आली आहे.माजी नगराध्यक्ष रविंद्र खुताडे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यावेळी जिजाऊ टिम उपस्थित होती.घरातील कर्ता पुरूष असणारे वारघडपाडा येथील 25 वर्षीय चंद्रकांत गवते यांचे दु:खद निधन झाले.घरात तेच एकटे कमावते असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर गवते कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावले आहे.याची माहीती मिळताच नेहमीप्रमाणे जिजाऊ मदतीला धाऊन गेली.गरीब, गरजु,पिडीत व निलेश सांबरेंची जिजाऊ संस्था हे जणू तालुक्यातील समीकरण झाले आहे.निलेश सांबरे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून नियमितपणे गरजूंना मदत करत असतात.आदिवासी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मदत करत असतात.त्यामुळे जिजाऊ बद्दल तालुक्यात आपलेपणाचे चित्र पहायला मिळत आहे.(Zilla Parishad vice president)