लग्न जुळविणाऱ्या साइट खरच सुरक्षित आहेत का ?

एका विवाहित तरुणाने  लग्न जुळविणाऱ्या साइट्स वरुन 30 हुन अधिक उच्च शिक्षीत तरुणींना लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केली.

लग्न जुळविणाऱ्या साइट खरच सुरक्षित आहेत का ?

लग्न जुळविणाऱया साईट्स वरुन 30 हुन अधिक सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढणारा, तसेच तरुणींचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या आरोपीला रबाले पोलिसांनी अटक केली आहे , हा आरोपी स्वतः उच्च शिक्षित तर आहेच पण त्याची दोन लग्न देखील झाली आहेत.


पालघर (palghar ) भागात विक्रमगड दहरेंजा या गावात राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने  लग्न जुळविणाऱ्या साइट्स वरुन 30 हुन अधिक उच्च शिक्षीत तरुणींना लग्नाचे अमिष दाखवून तसेच त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन त्यांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे असे या भामट्याचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याला बलात्कारासह, फसवणुकीच्या गुह्याखाली अटक केली आहे. सचिन ने  फसविलेल्या 16 तरुणींनी अतापर्यंत पोलीस ठाण्यात धाव घेतली असली तरी त्याच्या हातुन फसल्या गेलेल्या तरुणींची संख्या मोठी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

 आरोपी सचिन पाटील उर्फ सचिन सांबरे हा  विवाहित असतानाही त्याने स्वत:ला कधी अविवाहित, तर कधी घटस्फोटित, तर कधी घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याची माहिती  मॅट्रिमोनियल साईटवर टाकून लग्नास इच्छुक असलेल्या सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढले होते. दिसायला देखणा असल्याचा फायदा उचलत  सचिन पाटील याने तो रसायन शास्त्रामध्ये एम्.एससी. आणि मार्केटिंग एम.बी.ए.,जपानी कंपनीत सेल्स मॅनेजरचे पद, पगार पाऊण लाख असल्याची माहिती लग्न जुळविणाऱ्या साईटवर टाकली होती. तसेच कधी अविवाहित तर कधी घटस्फोटित असल्याचे तो भासवीत असल्याने त्याच्या मोहजालात लग्नाळू मुली सहज अडकत होत्या. त्यामुळे त्याने लग्नास इच्छुक असलेल्या तरुणींच्या विश्वासाचा, त्यांच्या भोळेपणाचा आणि वैयक्तिक वा घरगुती समस्यांचा गैरफायदा घेऊन त्यांचे शारीरीक, मानसिक व आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली होती.

अशाच पद्धतीने त्याने वर्षभरापुर्वी नवी मुंबईत(navi mumbai) रहाणाऱ्या एका वकील तरुणीला मॅट्रिमोनियल साइट वरुन आपल्या जाळ्यात ओढले होते. तिला आपली फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे रबाले पोलिसांनी सचिन मुळे पीडित असलेल्या महिलांनी तक्रारी साठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.


नवी मुंबई
प्रतिनिधी-सावन आर वैश्य

___________