न्याय हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे दलितांना आवाहन...

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी असला तर आपले न्याय हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी तामिळनाडू सह देशभरातील  सर्व दलितांना केले.

न्याय हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे दलितांना आवाहन...
Accept Buddhism to get the right to justice - Union Minister of State Ramdas Athavale's appeal to Dalits...

न्याय हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे दलितांना आवाहन...

 चेन्नई दि. 25 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी असला तर आपले न्याय हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी तामिळनाडू सह देशभरातील  सर्व दलितांना केले. चेन्नई पासून  जवळ असणाऱ्या अरकोनम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर च्या दीक्षाभूमीची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. या धम्म महोत्सवाचे ना रामदास आठवले यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. आपल्या उडघटकीय भाषणात ना रामदास आठवले यांनी देशातील सर्व दलितांना बौद्ध धम्म स्वीकारण्याचे आवाहान केले. यावेळी  आयोजक राजकांत; रिपाइं चे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष फादर सुसाई; आमदार रवी कुमार; रिपाइं चे नेते अरुण कुमार  आदी मान्यवर उपस्थित होते. 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीच्या काळात जातिभेदातून मोठया प्रमाणात अन्याय आणि अवहेलना  सहन करावी लागली. अस्पृश्यते चे चटके सोसावे लागले.बालपणात शिक्षण घेताना सातारा येथे शाळेबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले तर बडोदा संस्थानात अधिकारी पदावर नोकरी करताना शिपाई अस्पृश्यता  पाळून फाईल्स त्यांच्या कडे  दूर फेकून देत असत. या अन्यायाचा प्रतिकार करतानाच शेकडो वर्षांच्या गुलामगिरीला नष्ट करण्यासाठी स्पृश्य अस्पृश्य जातीभेद संपविण्यासाठी अन्याय व्यवस्थेला तिलांजली देऊन न्याय हक्क मिळविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. त्यामुळे आपणही जर  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी असाल तर बौद्ध धम्म स्वीकारा. तामिळनाडूतील दलितांवरही अन्याय होत असल्याच्या घटना घडत असतात. त्यांनी न्याय हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. 

बौद्धधम्म हा मानवतेचा धम्म आहे. समतेचा धम्म आहे. माणूस जोडणारा ; अंधश्रद्धेला विरोध करणारा विज्ञानवादी धम्म आहे. बौद्ध धम्म स्वीकारल्या बद्दल आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले. 

अरकोनम मध्ये  दीक्षाभूमी सारख्या   स्तूपाची प्रतिकृती उभारल्याचे पाहून   आपण नागपूर ला दीक्षाभूमीलाच आलो आहोत असे वाटत असल्याचे ना. रामदास आठवले यांनी संयोजकांचे कौतुक केले.  दरवर्षी लाखो अनुयायी दीक्षाभूमी ला धम्मचक्र प्रवर्तन दिनी येत असतात यंदा कोरोना मुळे दीक्षाभूमी ला समोरोह रद्द करण्यात आला असल्याने मी चेन्नई ला अरकोनाम मध्ये आलो असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.  पुढील वर्षी 14 ऑक्टोबर ला  तामिळनाडूत धम्मदीक्षा सोहळा आयोजित करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

मुंबई

प्रतिनिधी -संजय बोर्डे

________