पुण्यातील गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असं मला वाटलं - अजित पवार.
करोना आजाराचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून पूर्वीसारखी परिस्थिती होण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहे. मात्र त्याच दरम्यान दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मेळाव्यात करताच सभागृहात एकच हंशा पिकला.

पुण्यातील गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असं मला वाटलं - अजित पवार.
पिंपरी : करोना आजाराचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून पूर्वीसारखी परिस्थिती होण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहे. मात्र त्याच दरम्यान दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मेळाव्यात करताच सभागृहात एकच हंशा पिकला.
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे मनातून काढून टाका, पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचे पालन करावे तसेच आता करोना आजाराची दुसरी लाट येणार असे अनेक तज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, काही उमेदवार तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माझा आणि अन्य नेत्यांचा फोटो लावून प्रचार करीत आहे. त्यावर विशेष लक्ष ठेवा, आपल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करा, असे आवाहन त्यांनी केले.
या निवडणुकीत काहीनी चावटपणा केला.राज्यात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महा विकास आघाडीकडून चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे. पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. पण त्याच दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात आहे.
मात्र त्यामध्ये काहींनी मुद्दाम चावटपणा केला की, अरुण लाड यांच्या नावाचा असलेल्या एखाद्या व्यक्तीला अर्ज भरला भरण्यास सांगितला आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन, प्रत्येक मतदाराकडे जाऊन माहिती सांगण्याचे काम करावे असे उपस्थित कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी आवाहन केले.
पिंपरी
प्रतिनिधी - आत्माराम काळे
__________