म्हसा येथे अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या मुरबाड तालुका पदनियुक्तिचा कार्यक्रम संपन्न!
अखिल भारतीय ओबीसी महासभा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी ललित कुमार यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी रघुनाथ महाले यांच्या मार्गदर्शनातून नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे ३१ डिसेंबर ,२०२० रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हसा विभागातील पदनियुक्तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
म्हसा येथे अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या मुरबाड तालुका पदनियुक्तिचा कार्यक्रम संपन्न!
अखिल भारतीय ओबीसी महासभा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी ललित कुमार यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी रघुनाथ महाले यांच्या मार्गदर्शनातून नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे ३१ डिसेंबर ,२०२० रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हसा विभागातील पदनियुक्तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर सभेसाठी तालुक्यातील अनेक ओबीसीं बांधव उपस्थित होते. ठाणे जिल्हा अध्यक्ष ओबीसी धनाजी सुरोसे यांनी "जातिनिहाय जनगणना होणे काळाची गरज आहे ,हे समजून सांगत असताना ओबिसी समाजाची जनगणना जर होणार नसेल तर आमच्या जनगणनेचा काय उपयोग होणार आहे? आपण सर्वांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकाचे प्रथम त्याचे स्वागत करावे.
त्यानंतर अर्ज पाहून त्यांना स्पष्ट सांगावे की ओबीसीचा कॉलम नाही ह्या जनगणनेत आमचा सहभाग नाही. असे उत्तर द्यावे. आणि पॅन द्वारे रिमार्क मारून घ्यावे.असे सांगावे.जेणेकरून तो अहवाल प्रगणक आपल्या वरिष्ठांकडे देतील.वरिष्ठ जिल्हा- जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील आणि जिल्हाधिकारी हे मुख्यमंत्र्यांना पाठवतील.पुढे मुख्यमंत्री केंद्राकडे पाठवतील. जर या जनगणनेत ओबीसी समाजाचा १% जरी असहभाग असेल तरीही जागतिक पातळीवर या जनगणनेचा शून्य उपयोग होईल, म्हणून आपण सर्वांनी आपली माहिती देऊ नये तसेच आमचा जनगणनेमध्ये सहभाग नाही असे सांगावे.
तसेच सर्वांनी घराबाहेर पाटी लावून विरोध दाखवावा" असे सांगितले .त्यानंतर मूरबाड तालुका अध्यक्ष अनिल घुडे यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्यांची नियुक्ती सल्लागार पंढरीनाथ घुडे, जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत हरड, सुरज शेडगे, सचिव जयवंत पाटील , कल्याण तालुका अध्यक्ष भरत दळवी यांच्या हस्ते करण्यात आली. शेवटी मुरबाड तालुका उपाध्यक्ष जगदीश बांगर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले. यावेळी नरेश रांजने यांची मुरबाड तालुका सचिव, समीर घरत यांची उपाध्यक्ष, बलिराम बांगर यांची उपाध्यक्ष, बालकृष्ण इसामे यांची सचिव, अमोल एगड़े यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.
मुरबाड
प्रतिनिधि - लक्ष्मण पवार
___________