सर्वसामान्यांना मंत्रालय 1 फेब्रुवारी पासून खुले करून गेली दोन वर्षे सुरू असलेला छळ व मनस्ताप थांबवा टी डी एफ ची मागणी

कोविड महामारी काळात गेली २ वर्षे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बेदरकार वृत्तीमुळे माहिती अधिकार कार्यकर्ते, मानव अधिकार कार्यकर्ते,भ्रष्टाचार विरोधी लढणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता कायदेशिर हक्कांपासून वंचित आहेत.

सर्वसामान्यांना मंत्रालय  1 फेब्रुवारी पासून खुले करून गेली दोन वर्षे सुरू असलेला छळ व मनस्ताप थांबवा टी डी एफ ची मागणी
anti corruption activists

कोविड महामारी काळात गेली २ वर्षे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बेदरकार वृत्तीमुळे माहिती अधिकार कार्यकर्ते, मानव अधिकार कार्यकर्ते,भ्रष्टाचार विरोधी लढणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता कायदेशिर हक्कांपासून वंचित आहेत.कोवीड चे आडून  व मंत्रालयात प्रवेशच नसल्याने अत्यंत आवश्यक व महत्वाची प्रकरणे प्रलंबित असल्याने व काहीही रिप्लाय नसल्याने सर्व हवालदिल झाले आहेत.लॉकडाऊन मध्ये काही महिने मंत्रालयात निम्न श्रेणी अधिकारी , कर्मचाऱ्यांची ५०% हजेरी होती पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र काहीही कार्यवाही न केल्याने पत्रांची साधी पोच मिळत नव्हती तर मेल केल्यावर त्यावर कारवाई सोडा, उलट काहीही रिप्लाय मिळत नाही.या पार्श्वभूमीवर मा मुख्यमंत्री,मा उपमुख्यमंत्री मात्र प्रत्येक मेल ला रिप्लाय देऊन अर्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे व विभागाकडे पाठविण्यात आला असे तात्काळ उत्तर देतात पण मा मंत्र्यांचे आदेशानंतर संबंधित अधिकारी त्यावर तात्काळ जाऊ द्या  दिड -दोन वर्षात साधा रिप्लाय देत नाही व  अर्जावर कार्यवाही करणे व कळविणे हे त्यांना माहित च नाही, कारण अधिकाऱ्यांनी अर्जावर वर्षांनुवर्षे कारवाई केली नाही, अर्जदाराला काही कळविले नाही तर त्यांचे कुणी काहीही वाकडे करु शकत नाही याचा ठाम विश्वास असतो.काही गंभीर प्रकार उघडकीस आलेले आहेत  म्हणजे गंभीर भ्रष्टाचाराची प्रकरणे गहाळ झालेली आहेत असे उत्तर मिळाले आहे.(anti corruption activists)

मनस्ताप व त्रागा यासाठी ही की सर्व मंत्र्यांचे मोबाईल, मेल जाहिर झाल्याने मिळतात पण अधिकाऱ्यांचे मात्र मिळत नाही, लॅड्डलाईन फोन ची अवस्था दयनीय आहे . त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कुतरओढ व छळ सुरु आहे.एका बाजुला पैसेवाल्यांना व भ्रष्टाचाऱ्यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांचे आशीर्वादाने, वशिल्याने मुक्त प्रवेश मिळतो. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला प्रवेश नसल्याने, पत्र ही स्विकारत नसल्याने त्यांच्या हालाला पारावार उरला नाही. त्यामुळे आघाडी सरकार विरुद्ध रोष पसरला आहे. तेव्हा  कोविड चे दोन डोस घेतलेल्यांना कोविड नियम पाळण्याचे अटीवर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश देऊन महाआघाडी सरकार हे जनतेचे सरकार असल्याचा प्रत्यय येऊ द्या अशी मागणी मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी TDF चे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.(anti corruption activists)

जय हिंद

                     जनार्दन जंगले
                      अध्यक्ष
             शिक्षक लोकशाही आघाडी
                     TDF मुंबई
                  9892057818