अभिनेता अनुपम श्याम यांचे दीर्घआजाराने निधन

काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेता अनुपम श्याम यांचे दीर्घआजाराने निधन
anupam shyam

अभिनेता अनुपम श्याम यांचे दीर्घआजाराने निधन

काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे. अनुपम यांनी ‘लाईफ लाईन हॉस्पिटल’मध्ये अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

पण काही दिवसांपूर्वी तब्येतीत सुधारणा दिसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते.प्रसिद्ध दिग्दर्शक अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या मृत्यूची माहिती सर्वांना दिली आहे. त्यांनी ट्विट केले, ‘ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, हे जाणून अत्यंत दुःख झाले आहे.

चित्रपट आणि टीव्ही उद्योगासाठी हे एक मोठे नुकसान आहे.’गेल्या वर्षी, अभिनेता अनुपम श्याम यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या भावाने हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदतही मागितली होती. प्रकृती सुधारल्यानंतर अभिनेत्याला दररोज डायलिसिससाठी जावे लागत होते.

त्यानंतर, या वर्षी जेव्हा ‘मन की आवाज प्रतिज्ञा’चा दुसरा सीझन सुरू झाला, ते पुन्हा कामावर परतले होते. शूट संपल्यानंतर ते आठवड्यातून तीनदा डायलिसिसला जायचे.एका मुलाखतीत अनुपमने सांगितले होते की, तब्येत ठीक नसतानाही त्यांनी सज्जन सिंगचे पात्र साकारण्यासाठी हो का म्हटले होते.

 प्रेक्षकांना हे पात्र खूप आवडते आणि त्यांना क्षणभरही आपल्या चाहत्यांना निराश करायचे नव्हते.आयुष्याशी युद्ध लढत असताना, तिथून सुखरूप बाहेर आले आहेत. आता प्रतिज्ञा या शोच्या माध्यमातून मला पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.


त्यांनी ‘दस्तक’, ‘दिल से’, ‘लगान’, ‘गोलमाल’ आणि ‘मुन्ना मायकेल’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘रिश्ते’, ‘डोली अरमानो की’, ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘हम ने ली शपथ’ या सारख्या टीव्ही शोमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अभिनेते अनुपम श्याम उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील रहिवाशी होते.